Gunaah Series : प्रेम, विश्वास आणि विश्वासघाताची गोष्ट, गश्मिर महाजनीच्या गुनाहचा ट्रेलर;सुरभी ज्योतीसोबत दिसणार केमिस्ट्री
Gunaah Series : गश्मीर महाजनी, सुरभी ज्योती आणि झैन आबाद खान यांच्या 'गुनाह' या सिरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ही सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Gunaah Series : अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा सध्या 'खतरों के खिलाडी 14'चे शूटिंग करत आहे. त्यताच दुसरीकडे त्याच्या नव्या सिरिजचा ट्रेलरही रिलीज करण्यात आलाय. ट्रेलर खूपच दमदार आहे. या सिरिजमध्ये गश्मिरसोबत अभिनेत्री सुरभी ज्योतीचीही भूमिका आहे. गश्मीर महाजनीने या सिरिजमध्ये अभिमन्यूची भूमिका साकारली आहे. तसेच या सिरिजची कथा देखील त्याच्याच भोवती फिरते.
गुनाह ही सिरिज येत्या 3 जूनपासून OTT प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सिरजमधील भूमिकेसाठी गश्मीर महाजनी आणि सुरभी ज्योती खूप उत्सुक आहेत. तसेच या सिरिजच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांचा त्यांची केमिस्ट्री शेअर केली आहे.
View this post on Instagram
परिवर्तन करणारा अनुभव - गश्मिर महाजनी
दरम्यान गश्मिरने त्याच्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना म्हटलं की, अभिमन्यूची व्यक्तिरेखा साकारणं हा माझ्यासाठी खूप परिवर्तन करणारा अनुभव होता. या पात्राची सखोलता या गोष्टीला आणखी चांगलं बनवते. 'गुनाह'च्या संपूर्ण कलाकार आणि क्रूसोबत काम करताना खूप मजा आली. या प्रोजेक्टवर काम करताना मी सुरभी ज्योतीसोबत चांगला वेळ घालवला. ती एक अप्रतिम को-स्टार आहे आणि एक मैत्रीणही.
यासाठी मी खूप उत्सुक - सुरभी ज्योती
सुरभीने तिच्या व्यक्तीरेखेविषयी बोलताना म्हटलं की, या सिरिजची कथा आणि ती ज्या गतीने बनवली गेली आहे, त्यामुळे प्रेक्षक जागेवर खिळवून राहतील. ताराचा प्रवास, अभिमन्यूसारखाच, खूप मनोरंजक आहे. तो प्रवास पडद्यावर पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. गश्मीर आणि झैन इबाद खान यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद झाला. प्रेमाचा, आव्हानांचा, संघर्षाचा आणि विश्वासघाताचा हा प्रवास आपल्या चाहत्यांसमोर मांडण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत.
View this post on Instagram