एक्स्प्लोर

Gram Chikitsalaya : 'ग्राम चिकित्सालय'च्या दुसऱ्या सीझनचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी होणार प्रीमियर

Gram Chikitsalaya Season 2 Trailer Updates : या नव्या सीझनमध्ये भाथकंडी गावातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी डॉ. प्रभात यांचा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

Gram Chikitsalaya Season 2 Trailer : ओटीटी (OTT) वरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या मालिकांपैकी एक असलेल्या 'ग्राम चिकित्सालय' (Gram Chikitsalaya) या कॉमेडी ड्रामा सिरीजच्या दुसऱ्या सीझनचा धमाकेदार ट्रेलर 'प्राइम व्हिडिओ'ने (Prime Video) प्रदर्शित केला आहे. 'द वायरल फीवर' (TVF) निर्मित या सिरीजचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

ललितम तिवारी दिग्दर्शित आणि दीपक कुमार मिश्रा व अरुणाभ कुमार कृत या सिरीजचे लेखन वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी केले आहे. या नव्या सीझनमध्ये भाथकंडी गावातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राचे (PHC) पुनरुज्जीवन करण्यासाठी डॉ. प्रभात यांचा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

'आदर्श पीएचसी' दर्जा मिळवण्यासाठी धडपड

ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, डॉ. प्रभात (अमोल पराशर) हे भाथकंडी येथील अपयशी ठरलेल्या आरोग्य केंद्राची स्थिती सुधारण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला असं वाटत असतानाच, त्यांच्यासमोर आव्हानांचा एक नवीन डोंगर उभा राहतो.

आपल्या आरोग्य केंद्राला 'आदर्श पीएचसी' ही अधिकृत पदवी मिळवून देणे हेच सर्व समस्यांवरील उत्तर आहे, याची डॉ. प्रभात यांना खात्री पटते. मात्र, हा दर्जा मिळवण्यासाठी केवळ वैद्यकीय कौशल्य पुरेसे नसून स्थानिक राजकारण आणि अंतर्गत व्यवस्था सांभाळणे किती गरजेचे आहे, हे त्यांना समजते.

विचित्र गावकरी, खोडकर स्थानिक राजकारण, खोलवर रुजलेला संशय आणि संसाधनांची कमतरता या सर्वांशी लढा देत डॉ. प्रभात या समस्येवर कसा उपाय शोधतात, याची हलकी-फुलकी आणि भावनिक कथा या सीझनमध्ये पाहायला मिळेल.

अमोल पराशरसह 'निरहुआ'ची एन्ट्री!

या सिरीजमध्ये जुन्या कलाकारांसोबतच काही नवीन चेहरेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमोल पराशर, आकाश मखिजा, आनंदेश्वर द्विवेदी, विनय पाठक, आकांक्षा रंजन कपूर आणि गरिमा विक्रांत सिंग हे मुख्य भूमिकेत पुन्हा परतणार आहेत. भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिनेश लाल यादव (निरहुआ) हे या सीझनमध्ये 'बाबू साहेब' ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

23 जून रोजी होणार रिलीज

'ग्राम चिकित्सालय सीझन 2' चा प्रीमियर 23 जून 2026 रोजी संपूर्ण भारत तसेच जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये केवळ 'अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ'वर हिंदी भाषेमध्ये होईल. अॅमेझॉन प्राइम डेच्या (Amazon Prime Day) 10 व्या आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर हा शो ब्लॉकबस्टर एंटरटेनमेंट म्हणून सादर केला जात आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Embed widget