Girija Oak Blue Saree: ज्या ब्ल्यू साडीमुळे गिरीजा ओक रातोंरात नॅशनल क्रश बनली, 'ती' साडी दुसऱ्या एका मराठी अभिनेत्रीनं तिला दिलेली, नेमकं काय घडलेलं?
तिच्याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. तिची अनेक मुलाखती व्हायरल होताना दिसत आहेत.

Girija Oak Blue saree: अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) नेहमीच तिच्या सादगीसाठी, मनमोकळ्या आणि निखळ स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे ती नेहमीच चाहत्यांची मने जिंकत आली आहे. अलीकडेच एका रात्रीत National Crush ठरत गिरीजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. तिची अनेक मुलाखती व्हायरल होताना दिसत आहेत.
अचानक मिळालेल्या या लोकप्रियतेमुळे थोडीशी गोंधळलेली असली, तरी गिरीजाने या सगळ्या परिस्थितीला अत्यंत ग्रेसफुली सामोरं जाताना चाहत्यांच्या नजरा खिळल्या. तिचे काही फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाल्यानंतरही तिने अत्यंत संयमानं आणि योग्य शब्दांत नाराजी व्यक्त केली. तिच्या या प्रामाणिक प्रतिक्रियेचंही मोठ्या प्रमाणात कौतुक झालं.
National Crush अशी ओळख मिळाली असली, तरी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आणि विशेषतः नाट्यरसिकांमध्ये गिरीजा ओकच्या अभिनयाचं कौतुक कायमच होत आलं आहे. तिचा मोहक स्वभाव, अभिनयातील नैसर्गिकता यामुळे ती आजही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री राहिली आहे.
गिरीजाची निळी साडी देशभरात चर्चेचा विषय
नॅशनल क्रश झाल्यानंतर मराठमोळ्या गिरीजाची निळी साडी देशभरात चर्चेत आली. चंदेरी काठाच्या या साडीमध्ये गिरीजा खूप सुंदर दिसत होती. पण तुम्हाला माहिती आहे का गिरीजाच्या या निळ्या साडीशी अभिनेत्री प्रिया बापटच खास कनेक्शन आहे. एका मुलाखतीत गिरिजा ओकने निळ्या रंगाची ही सुंदर साडी नेसली होती. अर्थात गिरीजाचं नैसर्गिक सौंदर्य, तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि तिचं निखळ गोड हास्य यामुळे ती प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली. तिनं तिच्या या निळ्या साडी मागचे सिक्रेट सांगितलं आहे.
अभिनेत्री गिरीजा ओकला साडी नेसायला प्रचंड आवडते. तिचं साड्यांवरती नितांत प्रेम आहे. देशभरातल्या जवळपास 400 हून अधिक साड्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे. राज्यातील वेगवेगळ्या धाटणीच्या साड्या तिच्याकडे आहेत. पण ज्या इंटरव्यू मध्ये गिरिजानं निळी साडी नेसली होती ती तिच्या साड्यांचा कलेक्शन मधली नव्हती. अभिनेत्री प्रिया बापट नेसलेल्या आकाशी निळ्या रंगाच्या लिनन कपड्यातील ही सावेंचि ब्रँडकडून तिनं घेतली होती. हा ब्रँड अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचं बहिणीचा आहे. नुकत्याच एका मुलाखतीत गिरीजानं तिच्याकडे असलेल्या साड्यांचे कलेक्शन सर्वांना दाखवलं होतं. तिच्या साड्या दाखवता दाखवता गिरीजाने तिच्या निळ्या साडी मागची गोष्टही सांगितली.
निळ्या साडीचं सिक्रेट काय?
गिरीजानं त्या मुलाखतीत ही निळी साडी ठरवून घातली होती का? ही साडी तिच्या आवडीचा कलेक्शन मधली होती का असे अनेक प्रश्न तिला विचारण्यात आले. त्यावर गिरीजा म्हणाली," असं काही नव्हतं. प्रिया बापट आणि तिच्या बहिणीचा ब्रँड आहे सावेंचि. मी तिला फोन केला की मला साडी हवी आहे मी वापरून तुला परत करेन. आपण कुलाब्रेशन मध्ये पोस्ट करूया. प्रियाच्या बहिणीने म्हणजेच श्वेताने मला खूप साड्या पाठवल्या त्यातील ही साडी मी नेसली. मी त्यांचा आणखी बऱ्याच साड्या नेसल्या होत्या पण ही निळी साडी इतकी व्हायरल होईल आणि या साडीत मी सगळीकडे दिसेन असं आम्हाला वाटलं नव्हतं.
एखादी साडी पाहताक्षणी आवडते. त्या साडीशी एक नातं तयार होतं. तसंच काहीसं या निळ्या साडीसोबत झालं. गिरीजा म्हणाली मी श्वेताला म्हटलं की मी ही साडी काही दिवसांसाठी ठेवून घेऊ का? या साडीशी माझी थोडी अटॅचमेंट झाली आहे. ती मला म्हणाली हो ठेव ही तुझीच साडी आहे. ही तुझ्यासाठी गिफ्ट आहे.























