अयोध्येत 500 वर्षांनंतर श्रीराम विराजमान; देशमुखांची सूनबाई जिनिलिया म्हणते, "ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार झाल्याचा मला अभिमान"
Ram Mandir : अयोध्येत आज (दि.22) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी बॉलिवूडचे (Bollywod) अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित होते.
Ram Mandir : अयोध्येत आज (दि.22) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी बॉलिवूडचे (Bollywod) अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित होते. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यानंतर बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेत्री जिनिलियाची (Genelia) एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जेनेलिया म्हणाली, आजचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे. अयोध्येत रामाचे मंदिर झाल्याने संपूर्ण जग आज आनंदी आहे. आमचा राम अयोध्येत येत असताना अब्जावधींचा आवाज असल्याचा मला अभिमान आहे, अशा आशयाची पोस्ट जिनेलियाने केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Today is truly historic. Euphoria has engulfed the entire world. Am a proud to be a voice amongst the billion chants as our Ram Lalla comes home to Ayodhya. Sare bolo #JaiShriRam !!! #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/dNdHQdRlhm
— Genelia Deshmukh (@geneliad) January 22, 2024
उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थितीत
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हेजरी लावली होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कंगना रनौत, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास, मोहनलाल, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ हे बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनी पारंपारिक लूक केला होता.
जिनिलिया अयोध्येत उपस्थिती नाही
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हेजरी लावली होती. मात्र, रितेश आणि जिनिलिया देशमुख या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नव्हते. मात्र, जिनिलियाने ट्वीटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनी पारंपारिक लूक केला होता.
View this post on Instagram