एक्स्प्लोर

Gaurav More Wife: गौरव मोरेची बायको आहे तरी कोण? थेट साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर, बॉलिवूड दिग्दर्शकासोबतही केलंय काम

Gaurav More Marriage: गौरव मोरेनं प्रियांका कारेकरशी गुपचूप लग्न उरकलं. अभिनेत्याची पत्नी आहे तरी कोण?

Who Is Priyanka Karekar Wife Of Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. विशेषत: अभिनेता गौरव मोरेच्या (Gaurav More) स्टाइलला प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं.  'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणत अभिनेत्यानं प्रेक्षकांना खदखदून हसवलं. दरम्यान, गौरव मोरेनं गुपचूप नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. अखेर तो लग्नबंधनात (Gaurav More Wedding) अडकला आहे.  गौरवनं लग्न केलं असून, त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्यानं अनेकांना सुखद धक्का बसला. गौरवने नेमकं कुणासोबत लग्न केलं? गौरवची पत्नी आहे तरी कोण?  असे असंख्य प्रश्न सध्या नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे. दरम्यान, गौरव मोरेचं लग्न झाल्यापासून त्याच्यावर चाहते तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, अद्याप गौरव मोरेनं कोणतीही अधिकृत पोस्ट सोशल मीडियात शेअर केलेली नाही. चला तर मग गौरव मोरेची अर्धांगिनी आहे तरी कोण, जाणून घेऊयात. 

गौरवची पत्नी प्रियांका कारेकर आहे तरी कोण? (Gaurav More Wife Priyanka Karekar)

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव मोरेनं त्याच्या प्रेयसीशी लग्न केलं असल्याची माहिती आहे. गौरवची अत्यंत जवळची मैत्रिण ऋतुजा बागवे हिनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ऋतुजासोबत गौरव मोरे आणि त्याची पत्नी दिसत आहे.  या पोस्टला तिनं, 'मिस्टर अँड मिसेस मोरे' असं कॅप्शन दिलं आहे.  या पोस्टमधून गौरवनं लग्न केलं असल्याचं उघड झालं.  गौरव मोरेच्या पत्नीच्या हातावर मेहंदी आहे. तसेच तिच्या हातात हिरवा चुडा देखील दिसत आहे. तिनं सोनेरी रंगाची सुंदर साडी नेसली असून,  गळ्यात मंगळसूत्रही दिसत आहे. गौरव मोरेची पत्नी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

प्रियांका कारेकर असं गौरव मोरेच्या पत्नीचं नाव आहे. ती केवळ गौरवची पत्नी नसून, सिने इंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा देखील आहे. माहितीनुसार, गौरव मोरेची पत्नी उत्तम अभिनेत्री असून, तिनं अनेक प्रोजेक्टसाठी काम केलं आहे. तिनं आपल्या कारकि‍र्दीत  साऊथ इंडस्ट्रीतही काम केलं असल्याची माहिती आहे. तिनं  साऊथ इंडस्ट्रीतील  कलाकार दुलकर सलमानसोबत एका सिनेमासाठी स्क्रीन शेअर केली असल्याची माहिती आहे. तिनं आपल्या पोस्टमधून साऊथ इंडस्ट्रीतील बड्या कलाकारासोबत स्क्रीन  शेअर करतानाचा अनुभव शेअर केला आहे.  

प्रियांकाने आपल्या कारकि‍र्दीत हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे.  तिनं आर. बाल्की दिग्दर्शित चूप:  रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती.  या सिनेमात बॉलिवूडचे दिग्गज कलाकारांनी काम केलंय.  तसेच तिनं गौरी शिंदे यांसारख्या  बॉलिवूड दिग्दर्शकांसोबतही काम केलं. 

गौरवच्या आयुष्यात दुहेरी आनंद

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka karekar (@karekarpriyanka)

गौरवनं गुपचूप लग्न तर केलं, पण त्याच्या आयुष्यातील आणखी  एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यानं आपल्या हक्काचं घर घेतलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार, कुटुंब तसेच मित्रपरिवारांनी त्याच्या घराला भेट देत शुभेच्छा दिल्या. त्यानं आपल्या दारावर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' ही नेमप्लेट लावली आहे.  सध्या त्याच्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. गौरवच्या आयुष्यातील दुहेरी आनंद पाहून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
Embed widget