एक्स्प्लोर

सेलिब्रिटीजचे अकाऊंट हॅक करुन फेक लाईक्स, फॉलोअर्स पुरवण्याचं काम, एकाला अटक

सदर आरोपी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर सिनेमा, स्पोर्ट्स आणि इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे प्रोफाईल हॅक करून फेक लाईक्स आणि फॉलोअर्स पुरवण्याचं काम करत होता.

मुंबई: सोशल मीडिया स्कॅममध्ये मुंबई पोलिसांनी अजून एकाला अटक केली आहे. काशीफ मनसूर ( वय 30) आरोपीचं नाव असून तो पेशाने एक सिव्हिल इंजिनियर आहे.. www.amvsmm.com या वेबसाईट वरून काशिफ मनसूर हा गोरखधंदा चालवत होता. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा विविध सोशल मीडियावर सिनेमा, स्पोर्ट्स आणि इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे प्रोफाईल हॅक करून फेक लाईक्स आणि फॉलोअर्स पुरवण्याचं काम करत होता. काशिफ मनसूरने सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट वाढवण्याच्या 25000 ऑर्डर पूर्ण केल्या असून दोन कोटी तीन लाख फॉलोअर्स त्याने अवैधरित्या वाढवले असल्याची माहिती आहे. सेलिब्रिटीजचे अकाऊंट हॅक करुन फेक लाईक्स, फॉलोअर्स पुरवण्याचं काम, एकाला अटक काय आहे प्रकरण बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर भूमि त्रिवेदी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये तक्रार नोंदवली होती की, तिचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे.तिच्या तक्रारीनंतर इंटरनॅशनल रॅकेटचा एका सदस्या अभिषेख दौडे याला अटक करण्यात आली होती.  अटक केलेला आरोपी एका अशा इंटरनॅशनल रॅकेटचा सदस्य आहे, जो एका सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या माध्यमाने बड्या लोकांचे बनावट प्रोफाईल बनवून त्यांच्याबाबत चुकीचे आकडे, परफॉर्मन्स आणि खोट्या कमेंटच्या माध्यमाने लोकांची दिशाभूल करायचा.  खोटे प्रोफाईल बनवून त्यावर लाखो लाईक, व्हिव्ज आणि रिव्ह्यू कमेंट तयार करायचा, ज्यामुळे लोकांची दिशाभूल व्हायची. बनावट प्रोफाईल बनवून फसवणूक, गायिका भूमि त्रिवेदीच्या तक्रारीनंतर एकाला अटक
क्राईम ब्रांचच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटने जेव्हा याचा तपास सुरू केला तेव्हा कळलं की, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून खोटे प्रोफाईल बनवून लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जात होती. ज्यावर लाखो लाईक आणि कमेंट येत होत्या. तर काही खोट्या पोस्ट सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्याच्यामुळे समाजामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण होत होतं. याच्या व्यतिरिक्त अशाच प्रकारे खोट्या प्रोफाईलच्या माध्यमाने कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींना संपर्क करण्यात आला होता. ज्यामुळं सेलिब्रिटींच्या कमेंटनंतर अशा खोट्या बातम्या अधिक जलद गतीने पसरवण्यास मदत झाली असती. जास्त लाईक आणि कमेंट बघून लोकांची दिशाभूल करणे सोपं होतं. तसेच लोकांची दिशाभूल करणारी सोप्पं होतं.  क्राईम बँचच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपी अभिषेक दौडे याने 176 खोटे प्रोफाईल बनवले होते. ज्याचे कोटींच्या घरात फॉलोवर्स होते. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक दौडे हा समाजामध्ये तणाव आणि भीती निर्माण करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर करत होता. त्याच्यासोबत अजून त्याचे कोण साथीदार आहेत का? याचा शोध घेत असतानाच काशिफला पोलिसांनी अटक केली आहे. अजून कुठल्या देशांमध्ये याचे जाळे पसरलेले आहे, याचा तपास आता क्राईम ब्रँच करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget