एक्स्प्लोर

ठो-ठो! मुंबईत प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घराबाहेर गोळीबार; भितींवर दिसले गोळ्यांचे निशाण, परिसरात खळबळ

Mumbai Crime News: ओशिवरा येथील नालंदा सोसायटीमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना. लेखक-दिग्दर्शक आणि स्ट्रगलिंग मॉडेलच्या फ्लॅटबाहेर गोळ्यांचे निशाण.

Mumbai Crime News: सिनेविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील  ओशिवरा परिसरात एका लेखक दिग्दर्शक आणि स्ट्रगलिंग मॉडेलच्या घरावर गोळीबाराची घटना घडली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या नालंदा सोसायटीमध्ये संध्याकाळच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे.  एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.  तसेच घटनास्थळावरून पळ काढला.  सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. अज्ञात आरोपीनं नेमका गोळीबार का केला? याचा तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  लेखक आणि दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा (45) हे नालंदा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. तसेच स्ट्रगलिंग मॉडेल प्रतीक बैद  (29)  हे बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर राहतात. दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये  गोळ्यांचे निशाण आढळले. सायंकाळच्या सुमारास गोळीबार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच, ओशिवरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  संपूर्ण परिसराला वेढा घालून तपास सुरू केला.  गोळी नेमकी कुणी मारली?  कुणाला नेमकं लक्ष्य केले? हे सध्या स्पष्ट झालेले नाही.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. 

डीसीपी झोन 9 दीक्षित गेडाम म्हणाले,  "ओशिवरा येथील नालंदा इमारतीच्या  दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर एक गोळी आढळली आहे.  यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे".  मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभागाचे  अतिरिक्त पोलीस आयुक्त  परमजीत सिंह दलिया म्हणाले, "इमारतीच्या भितींवर गोळ्याचे निशाण आणि लाकडी पेटी आढळली आहे.  पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे".  दरम्यान, पोलीस इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पोलीस पथक सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार

सेलिब्रिटींच्या घरावर गोळीबाराच्या घटना घडत आल्या आहेत.  याआधी देखील सलमान खान याच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे.  सलमान खानच्या वांद्रे येथील फ्लॅटवर अज्ञात आरोपीनं गोळीबार करण्यात आला होता. बऱ्याचदा सलमान खानला जीवे मारण्याची देखील धमकी मिळाली आहे. तसेच कॉमेडीयन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘तारक मेहता’मध्ये मोठा ट्विस्ट! पोपटलालचं लग्न ठरणार? पण आधी पूर्ण करावी लागणार खास अट

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget