एक्स्प्लोर

विजय तेंडुलकरांच्या ‘झाला अनंत हनुमंत’ नाटकावर चित्रपट, ‘टायटल-पोस्टर’ प्रसारित!

स्फोटक विषय आणि पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध विजय तेंडुलकर यांच्या लेखनातील प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यांच्याच लेखणीतून अनेक नाटकावर आता चित्रपट येणार आहे.

मुंबई : विजय तेंडुलकर यांच्या समर्थ लेखणीतून अनेक नाटकं उभी राहिली. इतर साहित्याबरोबरच नाटकांतूनही त्यांचे समाजातील दोषारोपांवर खणखणीत वार होत असत. स्फोटक विषय आणि पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध विजय तेंडुलकर यांच्या लेखनातील प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. त्यांनी लिहिलेली 'शांतता कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल', 'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. त्यांचे अजून एक प्रभावशाली नाटक म्हणजे 'झाला अनंत हनुमंत'. आता यावर त्याच नावाचा चित्रपटही बनतोय.

कोरोना महामारीमुळे मरगळलेली मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ पाहत आहे. 'पुनश्च हरिओम' म्हणत या चित्रपटाने एक पाऊल पुढे टाकत, चित्रीकरण सुरु करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. सध्या प्रचलित असलेल्या प्रथेप्रमाणे निर्मात्यांनी कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवली असून चित्रपटाचे नाविन्यपूर्ण 'टायटल-पोस्टर' प्रसारित केले आहे. या 'फर्स्ट-लूक' मधील अवकाशात सूर मारणाऱ्या मनुष्यामुळे चित्रपटाविषयी कुतूहल नक्की निर्माण होते.

वास्तविकतेला धरून चालणाऱ्या 'झाला अनंत हनुमंत' या चित्रपटाची कथा एका सामान्य माणसाच्या आयुष्यावर बेतली आहे. गरिबीत राहणाऱ्या त्याची बायको कटकट करीत असते, मुलगा सतत आजारी पडत असतो, मुलीवर बडेजावाचा प्रभाव पडलेला असतो आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी लटपटी खटपटी करणारा मेव्हणा असतो. या सर्वांमुळे त्याचे आयुष्य निरस झालेले असते. अचानक एका अंधश्रद्धेमुळे असे काही घडते की त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.

मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत 'झाला अनंत हनुमंत' ची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रुजू होईल.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget