"प्रॉपर्टी माझ्या नावावर कर!” झोपडपट्टीत राहणाऱ्या इन्फ्लुएन्सरच्या घरी जाताच फराह खान रोस्ट, व्हिडिओ तुफान व्हायरल
शाहिदा अन्सारी मुंबईतील झोपडपट्टीत राहते आणि गेल्या 8 वर्षांपासून इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. नुकतेच तिचे 1 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.

Farah Khan: बॉलिवूडची दिग्दर्शिका फराह खान सध्या तिच्या कुकिंग व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेत असते. ती तिचा कुक दिलीपसोबत विविध सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या घरी जाऊन त्यांच्या आवडत्या डिशेस बनवते. अलीकडेच ती मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शाहिदा अन्सारीच्या घरी पोहोचली आणि तिथे घडलेलं सगळं सध्या व्हायरल होत आहे.
शाहिदा अन्सारी मुंबईतील झोपडपट्टीत राहते आणि गेल्या 8 वर्षांपासून इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. नुकतेच तिचे 1 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. तिच्या कुटुंबात पती आणि दोन मुली आहेत, आणि ती त्यांच्यासोबत मजेशीर रील्स बनवते. तिचे व्हिडिओ रोजच्या आयुष्यावर आधारित असतात.कधी कपडे धुताना, तर कधी रेसिपी सांगताना. मात्र तिचा रागीट आणि रोस्टिंग स्टाइल लोकांना खूप आवडते, त्यामुळे तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
फराह खानला घरातच केलं रोस्ट
जेव्हा फराह खान शाहिदाच्या एका खोलीच्या घरात पोहोचली, तेव्हा तिने त्यांचं स्वागतही रोस्टिंग करत केलं.व्हिडिओमध्ये शाहिदा म्हणते, “आमच्या गरीबांच्या घरी फराह मॅम आल्या आहेत.” यावर फराह तिला थांबवत “असं म्हणू नको, अमीर-गरीब काही नसतं” असं सांगते. पण शाहिदा लगेच भडकते आणि म्हणते, “जर तसं असेल तर तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर!” यानंतर ती दिलीपला बोलावून म्हणते, “हिला घेऊन जा, माझा खरा अवतार बाहेर येण्याआधी!” तिचा हा अंदाज पाहून प्रेक्षक हसून लोटपोट झाले.
View this post on Instagram
View this post on Instagram
10 जण एका खोलीत; स्ट्रगल ऐकून फराहही हैराण
फराह आणि दिलीप शाहिदासाठी गिफ्ट्स घेऊन गेले होते. यावेळी शाहिदाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. ती ज्या खोलीत राहते, तिथे एकूण 10 जण एकत्र राहतात, हे ऐकून फराह आश्चर्यचकित झाली. शाहिदाने कुटुंब कसं अॅडजस्ट होतं, हेही दाखवलं. शाहिदाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिच्या नवऱ्याने 8 वर्षांपूर्वी तिचं इंस्टाग्राम अकाउंट सुरू केलं. तेव्हापासून ती सतत कंटेंट तयार करत आहे. 2024 मध्ये तिचा ‘My Life My Rules’ हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आणि ती सोशल मीडियावर स्टार बनली. विशेष म्हणजे, ती याआधी आंटी किसको बोला या शोमध्येही दिसली होती, जिथे तिने फराह खानला जोरदार रोस्ट केलं होतं. त्यावेळी फराहने तिच्यासोबत कुकिंग व्लॉग करण्याचं वचन दिलं होतं आणि आता ते तिने पूर्ण केलं आहे.





















