एक्स्प्लोर

Faizan Ansari : 'हा सगळा पब्लिसिटी स्टंट, ह्यांना बायकोट केलं पाहिजे', गुरुचरण बेपत्ता प्रकरणावर अभिनेत्याची प्रतिक्रिया, पूनम पांडेच्या स्टंटसोबतही तुलना 

Faizan Ansari :  अभिनेता गुरुचरण सिंह हा गेल्या 22 दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. 

Faizan Ansari :  'तारक मेहता' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) बेपत्ता होऊन 23 दिवस झालेत. पण अजूनही त्याच्या बेपत्ता होण्यामागचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. एकीकडे, पोलिसांच्या टीमने रविवारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटला भेट दिली आणि त्याच्या सहकलाकारांची चौकशी केली. तसेच दुसरीकडे अभिनेत्याचे वडील आणि कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. पण दरम्यान, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्युएन्सर फैजान अन्सारी याने मोठा दावा केला आहे. गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) बेपत्ता होणे हा निव्वळ एक पब्लिसिटी स्टंट असून प्रसिद्धी मिळविण्यासाठी रचलेला डाव असल्याचं त्याने म्हटलं आहे.फैजानने अभिनेता बेपत्ता होण्याच्या प्रकरणाची तुलना पूनम पांडेच्या 'बनावट मृत्यू'शी केली आहे. 


कोर्टात अनेकदा आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला फैजान अन्सारी मीडियाशी बोलताना म्हणाला, 'मला याबद्दल फारशी माहिती नव्हती, मी ती टीव्ही मालिका जास्त पाहत नाही. माझ्या एका मित्राने माझ्यासोबत एका न्यूज मीडियाची लिंक शेअर केल्यावर मला कळले. गुरुचरण सिंहने दिल्लीत बेपत्ता झाल्याची बातमी जाणीवपूर्वक प्रसिद्ध केली असल्याचं स्पष्ट मतंही त्याने व्यक्त केलं आहे. त्यानंतर त्याने आपला मोबाईल पंजाबमधील एका ठिकाणी सोडला, असंही तो म्हणाला. पुढे त्याने म्हटलं की, हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी केलंय. मला कळतच नाही, की टीव्ही इंडस्ट्रीतील लोक असे का करतात?

'असे लोकं इंडस्ट्रीला लागलेला काळा डाग'

फैजान अन्सारी पुढे म्हणाले, 'यामध्ये किती मेहनत घेतली जाते, याची कल्पना करा, संपूर्ण दिल्ली पोलीस, संपूर्ण पंजाब पोलीस, संपूर्ण मुंबई पोलीस यात गुंतले आहेत. काल पोलिसांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर जाऊन असे का घडले हे जाणून घेतले. प्रसिद्धीसाठी हे जाणूनबुजून करणे अत्यंत चुकीचे असून इंडस्ट्रीला लागेलेला हा डाग आहे. आणखी एक गोष्ट सांगतो की टीव्ही इंडस्ट्रीतील या कलाकारांनी स्वत:ला मोठे सेलिब्रिटी समजू नये.

'मोठा सेलिब्रेटी बनवण्यासाठी असं करतात'

फैजान म्हणाला की, असे लोक स्वत:ला मोठे सेलिब्रिटी बनवण्यासाठी असे प्रकार करत असतात.गुरचरण सिंग सरदार आहे. एक सरदार असून त्याने असं केलं. दरम्यान फैजानच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा देखील सुरु आहे. 

ही बातमी वाचा : 

Sanjay Kapoor : 'तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी, पण मी त्याच्यापेक्षा जास्त आनंदी', तुलना करणाऱ्यांना अनिल कपूरच्या भावाचं उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Natak Mukkam Post Pandharpur: पंढरपूरच्या मातीतली गोष्ट थेट काळजाला भिडणार! रंगभूमीवर ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची जोरदार एन्ट्री
पंढरपूरच्या मातीतली गोष्ट थेट काळजाला भिडणार! रंगभूमीवर ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची जोरदार एन्ट्री
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget