(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Box office collection: 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' चांगलाच गाजतोय, राजकुमारनं जिंकली प्रेक्षकांची मनं, किती कोटींची कमाई केली?
हा चित्रपट दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी बनवला आहे. राज शांडिल्यने यापूर्वी ड्रीम गर्ल आणि ड्रीम गर्ल-2 असे दोन सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
Entertainment: राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी यांचा चित्रपट 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालाय. कॉमेडी ड्रामा आणि सस्पेन्स एंडिंग ने सजलेला या सिनेमातील राजकुमार रावच्या अभिनयाचे कौतुक होतंय. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसतय. चित्रपटाच्या पहिल्याच दिवसाच्या कमाईचा आकडा 3 कोटी रुपयांचा राहिला आहे. पहिल्याच दिवशीची या चित्रपटाची ओपनिंग चांगली झाली असून चेन्नईतील चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा सर्वाधिक पाहिला जातोय.
हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून या चित्रपटाची प्रशंसा होत आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसतात. मल्लिका शेरावतची ही दमदार भूमिका या चित्रपटात असून विजयराज, अर्चना पूर्ण सिंग, नितीश ठाकूर जयवंत सिंह राठोड हे कलाकारही सिनेमात दिसतायेत. दिग्दर्शक राज शांडिल्याच्या या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आणि जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
राजकुमारची कॉमेडी प्रेक्षकांना भावली
11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची कथा लग्नानंतरच्या हनिमून सिडी वरून सुरू होते. त्यानंतर पोलिसांपर्यंत प्रकरण जातं आणि या कथेला नव वळण मिळते. धमाकेदार कॉमेडी असलेला विकी विद्या का वो वाला व्हिडिओ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी बनवला आहे. राज शांडिल्यने यापूर्वी ड्रीम गर्ल आणि ड्रीम गर्ल-2 असे दोन सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
चेन्नईमध्ये सर्वाधिक पाहिला जातोय सिनेमा
11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाल्यापासून देशभरातील सिनेमागृहांमध्ये राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी यांची प्रमुख भूमिका असणारा कॉमेडी चित्रपट विकी विद्या का वो वाला व्हिडिओ देशभरात चांगलाच गाजतोय. चेन्नईमध्ये सर्वाधिक हा सिनेमा चालत असल्याचे सांगण्यात येतं. या चित्रपटाने पहिलाच दिवशी तीन कोटींची कमाई केली असून. चेन्नईमध्ये सर्वाधिक 69.33% तर बंगळुरू मध्ये 35% प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला. कोलकत्ता आणि दिल्लीमध्ये ही हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती.
हेही वाचा:
Jigara Box Office Collection : आलिया भटच्या 'जिगरा'मध्ये नाही दम, पहिल्या दिवशी खास कमाई नाही