Soni Razdan Birthday: 'त्या' फोन कॉलने Lovestory ला सुरुवात, सोनी राजदाननं केलं 2 मुलं असणाऱ्या महेश भट्टशी लग्न
1980 च्या दशकात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या सोनी राजदाननं महेश भट्टशी लग्न केलं. एका फोन कॉलनं त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती.
Soni Razdan Birthday: 80 च्या दशकात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी आणि आता आलिया भट्ट हिची आई अभिनेत्री सोनी राजदान यंदा तिचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण निर्माते महेश भट्ट यांचं पहिलं लग्न झालेला असताना आणि पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले असतानाही सोनी राजदानने महेश भट्ट यांच्याशी लग्न केलं . कशी झाली या दोघांच्या लव स्टोरीला सुरुवात ? 1986 मध्ये दूरदर्शन वर येणाऱ्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत सोनी राजदान हिने सुलोचना ही भूमिका साकारली होती . त्याचवेळी तिने दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला होता . दरम्यान एका मैत्रिणीच्या फोन कॉलनंतर त्यांच्या महेश आणि सोनी राजदान यांची भेट झाली . आधी मैत्री आणि नंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली .
माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि ..
एका मैत्रिणीला मला महेश भट्ट नावाच्या एका व्यक्तीशी बोलायचे आहे असे सांगितले . तेव्हा मी त्याला ओळखत नव्हते . पण नंतर आम्ही भेटलो प्रेमात पडलो आणि आता इथपर्यंत आलो आहोत असं सोनी राजदान यांनी आलिया आणि महेश भट्ट सोबत शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टवरही म्हटलं होतं .
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही
सोनी राजदान ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी आहे . याआधी त्यांनी 1968 मध्ये लॉरेन ब्राईटशी लग्न केले होते . जिचे नाव त्यांनी किरण असे ठेवले होते . या दोघांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले आहेत . पण नंतर महेश भट्ट यांची परविन बॉबी या अभिनेत्रीशी जवळीक वाढली . आणि त्यांनी स्वतःला पत्नी किरण पासून दूर केले . या दोघांनीही एकमेकांना कधीही घटस्फोट दिला नसला तरी महेश आणि परवीन हिचे नाते फार काळ टिकले नाही .
या चित्रपटादरम्यान महेश भट्टची भेट
काही काळानंतर सारांश या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री सोनी राजदान आणि महेश भट्ट यांची ओळख झाली . त्यावेळी सोनी राजदान इंडस्ट्रीत नवीन होत्या . लवकरच महेश भट्ट आणि सोनी राजदान एकमेकांना डेट करू लागले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले . त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . या दोघांना आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या दोन मुली आहेत .