Salman Khan: बिश्नोई गँगची धमकी, आता सलमानच्या बहिणीनं मुंबईतला आलिशान फ्लॅट 22 कोटींना विकला, काय चाललंय काय?
अर्पिताने हे अपार्टमेंट सिनेवाइज नावाच्या कंपनीला विकले असून, या विक्रीची सध्या जोरदार चर्चा आहे.
Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे तो बिश्नोई गँगच्या (bishnoi Gang) धमक्यांमुळे. राष्ट्रवादीचे नेते आणि सलमानचा जवळचा मित्र म्हणून ओळखले जाणारे बाबा सिद्दिकी यांचे गोळी झाडून हत्या झाल्यानंतर सलमानचे संपूर्ण कुटुंब सध्या चर्चेचा विषय ठरलाय. दरम्यान, या सगळ्या प्रकारात एक वेगळीच बातमी समोर आली आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा (Arpita Khan) हिने मुंबईतील तिचा आलिशान फ्लॅट 22 कोटी रुपयांना विकलाय. मुंबईतील खार परिसरातील प्रीमियम निवासी टॉवर मधले हे आलिशान अपार्टमेंट सीनेवाईज या कंपनीला विकल्याचे सूत्रांनी सांगितले.
या अपार्टमेंटच्या विक्रीचा करार नवरात्रीच्या दरम्यान झाल्याचं सांगण्यात येतं आहे. दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी एका अधिकाऱ्याचा हवाला देत पीटीआयचा वृत्तांत असं म्हटलं होतं, मुंबई वाहतूक पोलिसांना बॉलिवूड अभिनेता सलमान खान कडून पाच कोटींची मागणी करणाऱ्या धमकीचा संदेश आला होता. त्यानंतर आलेल्या या बातमीमुळे खळबळ उडाली आहे.
22 कोटींना घर विकले
मिळालेल्या माहितीनुसार आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांनी त्यांची प्रसिद्ध असलेली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी करारही केला असून हा सौदा 22 कोटी रुपयांना झाल्याचा सांगण्यात येते. आता शर्मा कुटुंब नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे,त्यामुळे या घटनेचा आणि सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचा परस्पर संबंध नसल्याचेही सांगण्यात येत आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिने मुंबईतील खार परिसरातील तिचे आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट तब्बल 22 कोटी रुपयांना विकले आहे. फ्लाइंग कार्पेट टॉवरच्या 13व्या आणि 14व्या मजल्यावर असलेल्या या 4,100 स्क्वेअर फूटाच्या अपार्टमेंटमध्ये 2,500 स्क्वेअर फूट बिल्ट-अप स्पेस आणि 1,600 स्क्वेअर फूट खासगी टेरेसचा समावेश आहे. यासोबतच नऊ कार पार्किंग स्लॉट्सही आहेत. अर्पिताने हे अपार्टमेंट सिनेवाइज नावाच्या कंपनीला विकले असून, या विक्रीची सध्या जोरदार चर्चा आहे.
दोन वर्षांपूर्वीच घेतलेले घर लगेच विकलेही...
फेब्रुवारी 2022 मध्ये अर्पिता खान शर्मा याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी चर्चेत होती. १७५० चौरस फूट पसरलेले अपार्टमेंट अर्पिता खान शर्माने 10 कोटी रुपयांना खरेदी केले होते. अवघ्या दोनच वर्षात या आली शान अपार्टमेंटला विकण्याचा निर्णय तिने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा: