Pushpa 2 : पुष्पा 2 चा प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर डंका, प्रीरिलीजची कमाई 1000 कोटींहून अधिक
साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन या आपल्या आवडत्या नटाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतल्याचं दिसतंय.
Pushpa 2 the rule pre release: खांदा वाकडा करून पुढे सरकणाऱ्या पुष्पाला यापूर्वीच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असताना अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट चित्रपटगृहात 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पण रिलीजच्या आधीच या सिनेमानं एक नवाच बेंच मार्क सेट केलाय. मनी कंट्रोलने दिलेल्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 या सिनेमानं रिलीज होण्यापूर्वीच 1085 कोटी रुपयांचा बिझनेस केलाय. या सिनेमनं प्रीरिलीजमध्येच एवढा गल्ला केल्यानं पुष्पा 2ची प्रेक्षकांमध्ये किती क्रेझ आहे हे लक्षात येईल.
साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन या आपल्या आवडत्या नटाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतल्याचं दिसतंय. पुष्पा या कॅरेक्टरमध्ये पाहण्यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षक आतुर असून हा सिनेमा सुपरहिट ठरणार हे प्री रिलीजच्या कमाईतून दिसतच आहे. स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जूनचे चाहते त्याच्या आगामी पुष्पा 2 चित्रपटाटची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याकडे चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. पुष्पा द रुल चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलरही लाँच करण्यात आला आहे.
प्रीरिलीज मधून 640 कोटी
पुष्पा टू या फिल्मने प्री रिलीज मधून आतापर्यंत 640 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नेटफ्लिक्स वर असणाऱ्या डिजिटल राइट्स मधून 275 कोटी तर वेगवेगळ्या राज्यांमधूनही कोटींचीच कमाई या चित्रपटाने केली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधून 220 कोटी, तमिळनाडू 50 कोटी, केरळ 20 कोटी तर इंटरनॅशनल फिल्म मार्केट मधून 40 कोटी रुपयांचा बिझनेस या चित्रपटाने केलाय.
पुष्पा 2 चा ट्रेलर पाहिला का?
पुष्पा 2 द रुल या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळत असल्याचं दिसतय. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची स्टार कास्ट असणारा हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
बॉक्सऑफिसवर पुष्पाचा धमाका
2021 मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातील गाणीही फार ट्रेंडमध्ये होती. आता पुष्पा 2 चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा द रुल चित्रपटाच्या गाण्यांनी आधीच प्रेक्षकांने वेड लावलं आहे, आता प्रेक्षक पुष्पाराज पाहण्यासाठी आतुरले आहेत.
हेही वाचा:
Pushpa 2 : 'पुष्पा 2' चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा, या दिवशी चित्रपटगृहात होणार दाखल