Neeyat trailer: एक पार्टी, एक मर्डर आणि अनेक रहस्य; विद्या बालनच्या 'नीयत' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 22 Jun 2023 04:57 PM
Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...
बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात... Read More
Neeyat trailer: एक पार्टी, एक मर्डर आणि अनेक रहस्य; विद्या बालनच्या 'नीयत' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नीयत (Neeyat) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल आहे. या ट्रेलरमधील विद्याच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Anupama: 'अनुपमा' मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; अनुपमा अमेरिकेला जाऊन तिची स्वप्नं पूर्ण करु शकणार?
'अनुपमा' (Anupama) मालिकेत अनेक ट्वीस्ट येणार आहेत. Read More
Kiran Mane: 'तिला वाटलं आपला नातू बिघडला !...'; किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष
किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. Read More
Adipurush Box Office: आदिपुरुष' च्या कमाईत घसरण; सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली एवढी कमाई
सहा दिवसात आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Vijay’s LEO First Look: वाढदिवसाला विजयनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; 'लियो' चा फर्स्ट लूक रिलीज
Vijay’s LEO First Look: विजयनं नुकतेच त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं लियो चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केलं आहे. Read More
सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर 'आदिपुरुष'मधील हनुमानाचा 'तो' डायलॉग बदलला; असा आहे नवा डायलॉग
 'आदिपुरुष' (Adipurush)  या चित्रपटातील कोणकोणते डायलॉग्स बदलण्यात आले आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ


Squid Game 2 Teaser Out : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. या या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. 


Adipurush box office collection Day 2 : पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; तरी दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा टप्पा


Adipurush box office collection Day 2 : रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 90 कोटींची जास्त कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 


Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती


Adipurush  Movie Latest Update : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमावर टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.