Vijay’s LEO First Look: वाढदिवसाला विजयनं दिलं चाहत्यांना गिफ्ट; 'लियो' चा फर्स्ट लूक रिलीज
Vijay’s LEO First Look: विजयनं नुकतेच त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं लियो चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
Vijay’s LEO First Look: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजयचा (Vijay) आज (22 जून) 49 वा वाढदिवस आहे. विजयचे चाहते त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयनं नुकतेच त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. त्यानं लियो चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांनी देखील लियो चित्रपटामधील विजयचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करुन विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लियो चित्रपटाचं पोस्ट शेअर करुन लोकेश कनागराज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा आहे लियोचा फर्स्ट लूक, वाढदिवसाच्या शुभेच्छा विजय अण्णा, तुझ्यासोबत पुन्हा काम केल्याचा आनंद होत आहे.' लोकेश कनागराज यांनी यांनी शेअर केलेल्या या लियो चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये विजयच्या हातात हतोडा दिसत आहे. हा लूक पाहून असा अंदाज लावू शकतो की, लियो या चित्रपटात विजयचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. लोकेश कनागराज यांनी शेअर केलेल्या या लियो चित्रपटाच्या फर्स्ट लूकला कमेंट करुन अनेकांनी या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
लियोची स्टार कास्ट
लियो चित्रपटात विजयसोबतच त्रिशा, संजय दत्त, अर्जुन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन, मन्सूर अली खान, सँडी आणि मायस्किन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
#LeoFirstLook is here! Happy Birthday @actorvijay anna!
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) June 21, 2023
Elated to join hands with you again na! Have a blast! 🤜🤛❤️#HBDThalapathyVIJAY #Leo 🔥🧊 pic.twitter.com/wvsWAHbGb7
रिपोर्ट्सनुसार, लियो या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होईल, असंही म्हटलं जात आहे.पण अजून चित्रपटाच्या टीमनं या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
View this post on Instagram
बालकलाकार म्हणून विजयनं चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नालया थीरपू' या चित्रपटामध्ये पहिल्यांदा लीड अभिनेता म्हणून त्यानं काम केलं. तेव्हा विजय 18 वर्षाचा होता. Poove Unakkaga या चित्रपटामुळे विजयला विशेष लोकप्रियता मिळाली. विजयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
संबंधित बातम्या