Telly Masala : अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा साखरपुडा ते महाराष्ट्राची फेव्हरेट मालिका 'ठरलं तर मग'; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 22 Jul 2023 04:09 PM
Telly Masala : अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा साखरपुडा ते महाराष्ट्राची फेव्हरेट मालिका 'ठरलं तर मग'; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत मुख्य भूमिकेत
Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Amruta Deshmukh Prasad Jawade : 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गुपचूप उकरला साखरपुडा; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात
Amruta Deshmukh Prasad Jawade : 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
PM Modi Biopic : नरेंद्र मोदींच्या भूमिकेत झळकणार अमिताभ बच्चन; बायोपिकच्या तयारीला सुरुवात
PM Modi Biopic : नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत असणार आहेत. Read More
Oppenheimer Review : ख्रिस्टोफर नोलानचा मास्टरपीस 'ओपनहायमर'
Oppenheimer : तुम्ही चांगल्या चित्रपटाचे आणि नोलानचे चाहते असाल तर 'ओपेनहाइमर' (Oppenheimer) हा चित्रपट चुकवू नका Read More
Baipan Bhaari Deva : "मराठी सिनेमांना संजीवनी मिळणं खूप गरजेचं"; 'बाईपण भारी देवा'च्या यशाबद्दल बोलताना उमेश कामतचं वक्तव्य
Umesh Kamat ON Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'मुळे प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळली, असं उमेश कामत म्हणाला. Read More
Tharla Tar Mag : प्रेक्षकांची पसंती 'ठरलं तर मग'ला; जाणून घ्या महाराष्ट्राच्या फेव्हरेट मालिकेबद्दल...
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. Read More
Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रींकडे यूजरने केली 'मणिपूर फाईल्स' बनवण्याची मागणी; थेट उत्तर देत म्हणाले,"तुमच्या 'टीम इंडिया'मध्ये एकही पुरुष निर्माता..."
Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडत असतात. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.