Telly Masala : अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा साखरपुडा ते महाराष्ट्राची फेव्हरेट मालिका 'ठरलं तर मग'; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Swanandi Tikekar Engagement : मेहंदी है रचने वाली... स्वानंदी टिकेकरच्या हातावर रंगली साखरपुड्याची मेहंदी
Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : अभिनेत्री, गायिका स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. आता साखरपुड्याच्या तयारीचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tharla Tar Mag : प्रेक्षकांची पसंती 'ठरलं तर मग'ला; जाणून घ्या महाराष्ट्राच्या फेव्हरेट मालिकेबद्दल...
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. गेल्या कित्येक आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) आणि 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारणाऱ्या मालिकांनाही या मालिकेने मागे टाकलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Baipan Bhaari Deva : "मराठी सिनेमांना संजीवनी मिळणं खूप गरजेचं"; 'बाईपण भारी देवा'च्या यशाबद्दल बोलताना उमेश कामतचं वक्तव्य
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 100 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेक्षकांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाच्या यशाबद्दल भाष्य करत आहेत. दरम्यान एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत उमेश कामत (Umesh Kamat) म्हणाला,"मराठी सिनेमांना संजीवनी मिळणं खूप गरजेचं आहे. 'बाईपण भारी देवा'मुळे प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळली आहेत".
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Amruta Deshmukh Prasad Jawade : 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गुपचूप उरकला साखरपुडा
Amruta Deshmukh Prasad Jawade : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय जोडी अर्थात अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अमृता आणि प्रसादने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर एका खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sara Kahi Tichyasathi : वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका (Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सिनेमे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म असले तरी मालिका पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. प्रेक्षकांना मालिकेत गुंतवून ठेवण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकही वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आता 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा