Baipan Bhaari Deva : "मराठी सिनेमांना संजीवनी मिळणं खूप गरजेचं"; 'बाईपण भारी देवा'च्या यशाबद्दल बोलताना उमेश कामतचं वक्तव्य
Umesh Kamat ON Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'मुळे प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळली, असं उमेश कामत म्हणाला.
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 100 कोटींच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेक्षकांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून या सिनेमाच्या यशाबद्दल भाष्य करत आहेत. दरम्यान एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत उमेश कामत (Umesh Kamat) म्हणाला,"मराठी सिनेमांना संजीवनी मिळणं खूप गरजेचं आहे. 'बाईपण भारी देवा'मुळे प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळली आहेत".
मराठी सिनेमांना संजीवनी मिळणं खूप गरजेचं : उमेश कामत (Umesh Kamat On Baipan Bhaari Deva)
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत 'बाईपण भारी देवा'च्या यशाबद्दल बोलताना उमेश कामत म्हणाला"बाईपण भारी देवा' मुळे मराठी सिनेसृष्टी पुन्हा बहरली असून अभिनेता म्हणून खूप छान वाटत आहे. मराठी सिनेमांना अशी संजीवनी मिळणं खूप गरजेचं आहे".
उमेश पुढे म्हणाला,"प्रेक्षकांना आवडतील असे सिनेमे-नाटक व्हायला हवेत. त्यानंतरचं प्रेक्षकांची पाऊल सिनेमागृहाकडे किंवा नाट्यगृहाकडे वळतील. प्रेक्षकांची पाऊले पुन्हा सिनेमागृहाकडे वळणं ही बाब सिनेसृष्टीसाठी खूप गरजेची आहे. 'बाईपण भारी देवा' सारख्या कलाकृतीमुळे प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळली आहेत, याचा नक्कीच आनंद आहे. प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे वळवणं ही कलाकारांची जबाबदारी असते. त्यामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते".
प्रशांत दामलेंसारखा एव्हरग्रीन नट म्हणून उमेश कामतला पाहिलं जातं. विनोदवीर प्रशांत दामले (Prashant Damle) काही दिवसांपूर्वी स्मृतिगंधला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते,"आमच्या पुढच्या पिढीचा नाटकावर प्रेम करणारा अभिनेता उमेश कामत आहे". याबद्दल बोलताना उमेश म्हणाला,"प्रशांत दामलेंसोबत माझी तुलना केली जाते. याचं खरचं दडपण येतं".
उमेश पुढे म्हणाला,"प्रशांत दामलेंसोबत माझी तुलना केली जाते. याचं खरचं दडपण येतं. त्यांच्यासमोर मी खरचं खूप लहान आहे. अजून मला खूप काही कमवायचं आहे. पण हे मी 'आशीर्वादरूपी कॉम्प्लिमेंट' म्हणून घेतो. त्यामुळे आणखी जोमाने काम करायला मला स्फूर्ती मिळते. या गोष्टीचा नक्कीच आनंद होतो पण थोडं दडपणही येतं".
'बाईपण भारी देवा'ची रेकॉर्डब्रेक कमाई!
'बाईपण भारी देवा' हा सिनेमा दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असलेला हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या