एक्स्प्लोर

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गुपचूप उरकला साखरपुडा; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय जोडी अर्थात अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अमृता आणि प्रसादने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर एका खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गपचूप उरकला साखरपुडा

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गपचूप साखरपुडा उरकला आहे. अमृता आणि प्रसादने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही रोमॅंटिक अंदाजात असून त्यांच्या हातात अंगठी पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये प्रसादने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला असून अमृताने पांढऱ्या रंगाचा ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे. 

फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे,"आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत". 'बिग बॉस स्टाईल कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अमृताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताना त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 18 नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत.

बिग बॉसच्या घरात झाली मैत्री अन्...

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरात त्यांची चांगली मैत्री झाली. या घरातील त्यांची भांडण आणि मिश्किल मैत्री चाहत्यांच्याही पसंतीस उतरली. बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतरही त्यांची मैत्री आणखी वाढली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

पुण्याची टॉकरवाडीने गाजवलाय छोटा पडदा

अमृता देशमुख 'पुण्याची टॉकरवाडी' म्हणूनही ओळखली जाते. 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेच्या माध्यमातून अमृताने मालिकाविश्वात पदार्पण केलं. फ्रेशर्स’, ‘देवा शप्पथ’, ‘मी तुझीच रे’, ‘आठशे खिडक्या नऊशे दार’  या मालिकांमध्ये अमृता महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. काही मराठी सिनेमांतही तिने काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी 4'च्या माध्यमातून अमृता देशमुख घराघरांत पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

Amruta Deshmukh : अमृता देशमुखचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपला; पुण्याची टॉकरवडी पोस्ट शेअर करत म्हणाली,"ऑल इज नॉट वेल"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget