Entertainment News Live Updates 8 June: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jun 2022 04:19 PM
'विक्रम'च्या दिग्दर्शकाला दिली महागडी आलिशान गाडी भेट

'विक्रम'च्या यशाने कमल हासन खूश झाले आहेत. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. लोकेश कनगराज यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'विक्रम'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने कमल हासन यांनी लोकेश कनगराज यांना खास महागडी आलिशान गाडी भेट दिली आहे. या गाडीची किंमत 2.5 कोटी आहे. 

अरुंधतीचं स्वप्न पूर्ण होणार; आशुतोषचं नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अरुंधतीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अरुंधती आणि आशुतोषचं नवं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेत सध्या अरुंधतीच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरू आहे. 

Zol Zaal : निर्मात्याचं अभिनय क्षेत्रात पाऊल! ‘झोलझाल’ चित्रपटतून अभिनेता अमोल कागणे प्रेक्षकांच्या भेटीला

Amol Kagane : 'हलाल', 'भोंगा', 'बेफाम', 'वाजवूया बँड बाजा', 'लेथ जोशी' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोल कागणेने 'बाबो' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले असून, येत्या 1 जुलैला पुन्हा एकदा तो नव्याकोऱ्या आणि हास्यांची मैफिल घेऊन 'झोलझाल' (Zol Zaal) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पदार्पणातच एक ना अनेक पारितोषिकं पटकावणारा हा तरुण निर्माता, अभिनेता म्हणजे एक अजब रसायनच आहे. हा मेडिकलचा विद्यार्थी आपल्या फावल्या वेळात मनोरंजनासाठी नाटकं करू लागला आणि त्यातूनच अमोलला त्याच्या करिअरची अचूक दिशा गवसली.


नेहमी बॅक ऑफ द कॅमेरा रमणारा अमोल सध्या फ्रंट कॅमेरा एन्जॉय करतोय. 'झोलझाल' या चित्रपटात अमोलला पाहणे रंजक ठरणार आहे. 'झोलझाल' या चित्रपटात अमोल ‘जय’ या पात्राची भूमिका साकारत आहे. जय आणि वीरूची ही गोष्ट आहे. जय हा वीरूचा मोठा भाऊ असून, तो त्याच्या प्रत्येक गोष्टीत वीरूला सहभागी करतो. चित्रपटातील प्रत्येक सिन हा कॉमेडी आहे. चित्रपटात जशा घटना घडत जातात, तसे विनोदाचे पदर उघडत जातात.


वाचा संपूर्ण बातमी

मनोरंजन क्षेत्रात पदार्पणापूर्वी ‘बॉडीगार्ड’ होता रोनित रॉय, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासाठी केलेय काम!

Ronit Roy Untold Story: अनुराग कश्यपच्या ‘उडान’ चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेलं टीव्ही स्टार रोनित रॉय (Ronit Roy) याने अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. पण, टीव्ही स्क्रीन गाजवणारा हा अभिनेता मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी चक्क बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. एका मुलाखतीदरम्यान रोनितने स्वतः याचा खुलासा केला होता की, त्याने दोन वर्षे आमिर खानचा (Aamir Khan) बॉडीगार्ड म्हणून काम केले होते. याविषयी सांगताना रोनित म्हणाला, 'याबद्दल बोलायचे नाही, कारण अनेकांना वाटते की मी केवळ प्रसिद्धीसाठी मोठ्या कलाकारांचे नाव वापरत आहे. पण, ती दोन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वर्षे होती. आमिर खान त्याच्या कामासाठी खूप मेहनत घेतो.’


वाचा संपूर्ण बातमी

Huma Qureshi: हुमा कुरेशीनं पूर्ण केलं 'तरला' चित्रपटाचं शूटिंग; 'तरला दलाल' यांच्या आयुष्यावर आधारित असणार चित्रपट

Huma Qureshi: अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) आता भारतातील पहिल्या होम शेफ 'तरला दलाल' (Tarla Dalal) यांची भूमिकेत दिसणार आहे. तरला या चित्रपटाचं शूटिंग हुमानं पूर्ण केलं आहे. 37 दिवसांमध्ये हुमानं या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. 





Pooja Hegde : ‘जन गण मन’ चित्रपटासाठी पूजानं घेतले कोट्यवधींचे मानधन; स्टाफला देखील मिळणार एक कोटी

Pooja Hegde : अभिनेत्री पूजा हेगडेच्या (Pooja Hegde) 'राधे श्याम' या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या ती ‘जन गण मन’(Jan Gana Mana) या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि पूजा हे एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटासाठी पूजानं आणि तिच्या स्टाफनं कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे. जाणून घेऊयात तिच्या फीबाबत...


वाचा सविस्तर बातमी 

Ms. Marvel : ‘मिस मार्व्हल’चा ग्रँड प्रीमिअर, मार्व्हल सिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेताही झळकणार!

Ms Marvel Trailer : मार्वल स्टुडिओच्या (Marvel Studios) बहुप्रतिक्षित सिरीज ‘मिस मार्वल’चा (Ms Marvel) आज (8 जून) ग्रँड प्रीमिअर होणार आहे. अभिनेत्री इमान वेलानी (Iman Vellani) यात ‘कमला खान’च्या (Kamala Khan) भूमिकेत दिसत आहे. अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) मार्वल स्टुडिओच्या पहिल्या मुस्लिम सुपरहिरो सीरीज 'मिस मार्वल'मध्ये झळकणार आहे.


मार्वलच्या या सीरीजमध्ये बॉलिवूड सुपरस्टार फरहान अख्तर पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत फरहान अख्तरच्या व्यक्तिरेखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


वाचा संपूर्ण बातमी

Johnny Depp : जॉनी डेपनं बटर चिकन, नान अन् पनीर टिक्कावर मारला ताव; रेस्टॉरंटचं बिल ऐकून व्हाल अवाक्

Johnny Depp : गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारा हॉलिवूडचा स्टार जॉनी डेप (Johnny Depp) हा नुकताच एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. जॉनी आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यातील मानहानीचे प्रकरण बरेच दिवस चालले होते. हे प्रकरण सतत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिले होते. सहा आठवडे चाललेल्या या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने आपला निकाल दिल. जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. नुकतीच जॉनीनं त्याच्या काही मित्रांसोबत इंडियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली. जॉनीनं या रेस्टॉरंटमध्ये अनेक भारतीय पदार्थांवर ताव मारला. 


वाचा सविस्तर 

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैय्या-2 नं 100 कोटी क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा काय केलं?'; चाहत्यांच्या प्रश्नाला कार्तिकनं दिलं उत्तर

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनच्या (kartik Aaryan) भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या  चित्रपटानं 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. या हॉरर फिल्मनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता कार्तिकला अनेकांनी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रश्न विचारले. या प्रश्नांना कार्तिकनं उत्तरं दिली आहेत. आस्क मी एनीथिंग या सेशनमध्ये कार्तिकला एका नेटकऱ्यानं कार्तिकला प्रश्न विचारला, '150 कोटींमधले तुला किती प्रॉफिट मिळाले? ' या प्रश्नाला कार्तिकनं उत्तर दिलं, '150 कोटींमध्ये प्रॉफिट नाही तर चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे.'


वाचा सविस्तर 

सलमानच्या ‘टायगर 3’मध्ये शाहरुख खान करणार कॅमिओ, ‘किंग’ खानचा इंट्रो सीन असणार खास!

Tiger 3 Update : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘दबंग’ खानच्या या चित्रपटाचे शूटिंग जवळपास संपले आहे. दररोज या चित्रपटाबाबत काही ना काही बातम्या समोर येत असतात. दरम्यान, आता बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सलमानच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.


गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, सलमान खानने मुंबईत शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' (Pathaan)  चित्रपटासाठी त्याचा कॅमिओ शूट केला होता. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटासाठी, सलमानने रशियन माफिया, बंदुका, कार, हेलिकॉप्टर आणि ट्रेनसोबतच्या अॅक्शन सीनसाठी सुमारे 10 दिवस शूट केले होते. आता शाहरुख खान देखील त्याच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले राजेश खन्ना-डिम्पल कपाडिया, वयाच्या अंतराला विसरून बांधली होती लग्नगाठ!

Dimple Kapadia Birthday : बॉलिवूड अभिनेत्री डिम्पल कपाडिया (Dimple Kapadia) आज त्यांचा 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. 60 ते 70च्या दशका डिम्पल कपाडिया यांनी बॉलिवूड विश्व गाजवले होते. त्यांनी त्यांच्या काळात अनेक हिट चित्रपट दिले होते. या चित्रपटांमधून त्यांना खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकेची पारंपारिक प्रतिमा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे डिम्पल कपाडिया. डिम्पल कपाडिया यांनी वयाच्या अवघ्या 15-16व्या वर्षी ‘बॉबी’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.


ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया यांची जोडी खूप पसंत केली गेली. ‘बॉबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि डिम्पल कपाडिया यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये त्यांनी खूप बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटानंतर डिम्पल यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या.


वाचा संपूर्ण बातमी

Happy Birthday Shilpa Shetty : जाहिरातीतून केली करिअरची सुरुवात, आता बॉलिवूडला देतेय फिटनेस गोल्स!

Shilpa Shetty Birthday : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आज (8 जून) तिचा 47वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पा आता दोन मुलांची आई आहे, पण तिला पाहून याचा अंदाज लावणं थोडं कठीण होऊन जातं. कारण, इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत शिल्पाला केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर, ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. शिल्पा जितकी उत्तम डान्सर आहे, तितकाच सुंदर ती अभिनयही करते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती. आता ती बॉलिवूड विश्व गाजवतेय.


सध्या शिल्पा शेट्टी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘सुपर डान्सर चॅप्टर’ या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे. शिल्पा शेट्टीचा जन्म 8 जून 1975 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. 1991मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात केली. एका जाहिरातीतून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर 1993मध्ये शिल्पाला ‘बाजीगर’ या चित्रपटात भूमिका मिळाली. या चित्रपटाद्वारे तिने फिल्मी दुनियेत पहिले पाऊल ठेवले.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सलमान खानला मिळालेल्या पत्राचा तपास सुरू; दबंग खानने नोंदवला जबाब


बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले असून त्या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत. मुंबई पोलिसांनी आता सलमान, सलीम खान आणि बॉडी गार्डसह त्यांच्या संपर्कातील काही लोकांचा जबाब नोंदवला आहे.


‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड, 11 दिवसांत विक्रमी कमाई!


‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी या चित्रपटात ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला आहे. इतिहासाचं सुवर्ण पान उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 18.20 कोटींची कमाई केली आहे.


‘गोकुळधाम सोसायटी’मध्ये होणार ‘दयाबेन’ची वापसी!


छोट्या पडद्यावरची  लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेत ‘तारक मेहता’ साकारणारे अभिनेता शैलेश लोढा  यांनी हा शो सोडल्याची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे ‘बबिता’ साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तादेखील मालिकेचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या सगळ्या चर्चा सुरु असतानाच मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक कलाकार मालिका सोडण्याच्या वाटेवर असताना आता मालिकेत ‘दया बेन’ची वापसी होणार आहे.


कोरियन सिरीज 'ऑल ऑफ अस आर डेड'च्या दुसऱ्या सीझनची घोषणा, नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित!


प्रेक्षकांना लवकरच कोरियन वेब सिरीज ‘ऑल ऑफ अस आर डेड’चा दुसरा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या वेब सिरीजच्या पहिल्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नेटफ्लिक्सने ‘ऑल ऑफ अस आर डेड’चा दुसरा सीझन जाहीर केला आहे. या सिरीजच्या पहिल्या सीझनमध्ये दाखवलेल्या झॉम्बी कथेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. आता या सिरीजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा ऐकून चाहतेही खुश झाले आहेत.


सम्राट पृथ्वीराजनंतर खिलाडी कुमार करणार करण जोहरचा सिनेमा; सी शंकरन नायर यांचा बायोपिक


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. 'सम्राट पृथ्वीराज'नंतर अक्षय कुमार आता करण जोहरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत अनन्या पांडेदेखील दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.