मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha) घोषणा झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा एकला चलो रेचा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit bahujan aghadi) विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. मनसेनं सर्वप्रथम 7 मतदारसंघात उमेदवारांची यादी जाहीर केली असून वंचितने आत्तापर्यंत 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, आता महायुती (Mahayuti)महाविकास आघाडीतील (MVA) पक्षांकडून जाहीर होणाऱ्या उमेदवारांच्या नावांची सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिली आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानुसार, आत्तापर्यंत 7 उमेदवार जाहीर करणयात आले असून राज ठाकरेंनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिलीय. तर, प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर, वंचितचे परिपत्रक काढून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान, राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा 2024 च्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.  


राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेच्या उमेदवारांची यादी


1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. यवतमाळ - राजू उंबरकर


वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी


1. रावेर - शमिभा पाटील
2. सिंधखेड राजा - सविता मुंडे 
3. वाशीम - मेघा डोंगरे
4. धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
5. नागपूर साऊथ वेस्ट -  विनय भांगे
6. डॉ. आविनाश नन्हे - साकोली
7. फारुख अहमद - दक्षिण नांदेड
8. शिवा नरांगळे -लोहा
9. विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)
10. किसन चव्हाण - शेवगाव
11. संग्राम माने - खानापूर 
12. मलकापुर विधानसभा - शहेजाद खान सलीम खान 
13. बाळापूर विधानसभा - खतीब सैय्यद नातीकोद्दीन 
14. परभणी विधानसभा - सय्यद समी सय्यद साहेबजान 
15. औरंगाबाद मध्य विधानसभा - जावेद मो. इसाक 
16. गंगापूर विधानसभा - सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर 
17. कल्याण पश्चिम विधानसभा - अयाज गुलजार मोलवी 
18. हडपसर विधानसभा - मोहम्मद अफरोज मुल्ला 
19. माण विधानसभा - इम्तियाज जाफर नदाफ 
20. शिरोळ विधानसभा - आरिफ मोहम्मद अली पटेल 
21. सांगली विधानसभा - आल्लाउद्दीन हयातचाँद काजी 


22. धुळे शहर - जितेंद्र शिरसाट  
23. सिंदखेडा - भोजासिंग तोडरसिंग रावल
24. उमरेड - सपना राजेंद्र मेश्राम
25. बल्लारपुर - सतीश मुरलीधर मालेकर
26. चिमुर - अरविंद आत्माराम सदिकर
27. किनवट - प्रा. विजय खुपसे
28. नांदेड उत्तर - प्रा. डॉ. गौतम दुथडे
29. देगलूर - सुशील कुमार देगलूरकर
30. पाथरी - विठ्ठल तळेकर
31. परतूर-आष्टी - रामप्रसाद थोरात 
32. घनसावंगी - सौ.कावेरीताई बळीराम खटके
33. जालना - डेव्हिड धुमारे
34. बदनापुर - सतीश खरात
35. देवळाली - अविनाश शिंदे
36. इगतपुरी - भाऊराव काशिनाथ डगळे
37. उल्हासनगर - डॉ. संजय गुप्ता
38. अणुशक्ती - नगर सतीश राजगुरू
39. वरळी - अमोल आनंद निकाळजे
40. पेण - देवेंद्र कोळी
41. आंबेगाव - दिपक पंचमुख
42. संगमनेर - अझीज अब्दुल व्होरा
43. राहुरी - अनिल भिकाजी जाधव
44. माजलगाव - शेख मंजूर चांद
45. लातुर शहर - विनोद खटके
46. तुळजापूर - डॉ. स्नेहा सोनकाटे
47. उस्मानाबाद - अॅड. प्रणित शामराव डिकले
48. परंडा - प्रविण रणबागुल
49. अक्कलकोट - संतोषकुमार खंडू इंगळे
50. माळशिरस - राज यशवंत कुमार
51. मिरज - विज्ञान प्रकाश माने