एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 6 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 6 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Alia-Ranbir Welcome Baby Girl: आलिया आणि रणबीरला कन्यारत्न

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलियानं सर एच एन रिलायन्स रुग्णालयात ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) बाळाला जन्म दिला. आलियाला आज (5 नोव्हेंबर) सकाळी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. 

Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरीचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक

Jui Gadkari : स्टार प्रवाह वाहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवी मालिका घेऊन येत आहे. ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) असं या मालिकेचं नाव असून मराठी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी नवी गोष्ट आणि नवी पात्र भेटीला येणार आहेत. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असणार आहे. 5 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. 

Aaron Carter Death: गायक-रॅपर आरोन कार्टनचं निधन

Aaron Carter: प्रसिद्ध गायक आणि रॅपर आरोन कार्टरचं (Aaron Carter) शनिवारी (5 नोव्हेंबर) निधन झालं आहे. त्यानं वयाच्या 34 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आरोन कार्टरचा मृतदेह कॅलिफोर्नियातील (California) त्याच्या घरात संशयास्पद अवस्थेत  सापडला. फार कमी वयातच आरोन लोकप्रिय गायक आणि रॅपर झाला. त्यानं वयाच्या 9 व्या वर्षी त्याचा पहिला अल्बम रिलीज केला होता.

ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश आळेकरांना विष्णूदास भावे पुरस्कार

आद्य नाटककार विष्णूदास भावे यांच्यापूर्वीही नाटके होत होती. परंतु या नाटकाचा व्यवसाय होऊ शकतो, हे विष्णुदास भावे यांनी दाखवून दिले, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले. 5 नोव्हेंबर या रंगभूमी दिनी आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानीत करण्यात आले. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याहस्ते आळेकर यांना गौरव पदक प्रदान करण्यात आले. सांगलीतील भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, नाट्य परिषदेतील वाद मिटावेत आणि लवकर नाट्य संमेलन व्हावे. 100 व्या नाट्य संमेलनाचं साचलेलं पाणी प्रवाही करावे, आणि लवकरात लवकर नाट्य संमेलनाच आयोजन करावे अशी मागणी आळेकर यांनी जब्बार पटेल यांच्याकडे केली. 

15:32 PM (IST)  •  07 Nov 2022

Alia-Ranbir Welcome Baby Girl: रणबीर की आलियासारखी? कपूर घराण्यातील छोटी परी दिसते कशी? नितू कपूर म्हणाल्या...

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी काल (6 नोव्हेंबर) चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. अनेक जण सध्या आलिया आणि रणबीरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शुभेच्छा देत आहेत. नुकताच नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नीतू कपूर  (Neetu Kapoor) यांनी आलियाच्या हेल्थबाबात अपडेट दिली तसेच कपूर घराण्यातील छोटी परी कशी दिसते? या चाहत्यांच्या प्रश्नाचे देखील उत्तर दिलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

14:34 PM (IST)  •  07 Nov 2022

Priyanka Chopra : मुंबई सोडताना प्रियांका चोप्रा भावूक

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच मुंबईहून दिल्लीला रवाना झाली आहे. तीन वर्षांनंतर 'देसी गर्ल' भारतात आली होती. त्यामुळे मुंबई सोडताना ती खूपच भावूक झालेली दिसली. सोशल मीडियावर तिने मुंबईतील प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियांका तिच्या हेअर केअर ब्रँडच्या प्रमोशनसाठी भारतात आली असल्याचं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

13:43 PM (IST)  •  07 Nov 2022

You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग

You Must Die : कोरोनानंतर नाट्यसृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या धाटणीची नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे (Vijay Kenkre) लवकरच 'यू मस्ट डाय' (You Must Die) हे रहस्यमय नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saurabh Gokhale (@sauraabhgokhaale)

13:24 PM (IST)  •  07 Nov 2022

MC Square: 'हसल 2.0' चा विजेता एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला, 'आनंदी राहा...'

MC Square Got Praise From Virat Kohli: छोट्या पडद्यावरील  हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला.  हसल 2.0 या कार्यक्रमाचा एमसी स्क्वेअर (MC Square) हा स्पर्धक विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक जण एमसी स्क्वेअरला शुभेच्छा देत आहेत. नुकताच एमसी स्क्वेअरला  क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) एक खास मेसेज केला. मेसेज करुन विटारनं एमसी स्क्वेअरचं कौतुक केलं आहे. 

 
12:30 PM (IST)  •  07 Nov 2022

Movie Release This Week : रितेश देशमुखचा 'मिस्टर मम्मी' ते जितेंद्र जोशीचा 'गोदावरी'; या आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?

Movie Release This Week : गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे तीन सिनेमे प्रदर्शित झाले. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तिन्ही सिनेमे कमी पडले आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रदर्शित होणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील की नाही असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. या आठवड्यातही अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांना थरार, नाट्य,, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात ऊंचाई, मिस्टर मम्मी, गोदावरी अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटकZero Hour Sai Baba Ideol : धर्माच कारण देत साईंना लक्ष करणं थांबायला हवं का?Zero Hour MVA Mumbai Seat Sharing :मविआत 'मुंबई का किंग' कोण बनणार?वांद्रे पूर्वमध्ये सांगली पॅटर्न?ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget