एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 6 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 6 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Pathaan Box Office Collection : रिलीजच्या दहा दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच दबदबा; 400 कोटींचा टप्पा पार

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसला सुगीचे दिवस दाखवले आहेत. वीकेंड आणि वर्किंग डे कोणत्याही दिवशी बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच बोलबाला आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशीही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 

Tharla Tar Mag : ठरलं तर मग; मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायली अर्जुनसोबत करणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज!

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुनचा लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता या विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे. 

R. Madhavan: 'थ्री-इडियट्स'साठी आर. माधवननं दिलेल्या ऑडिशनचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'त्याला ऑडिशन देण्याची गरज...'

R. Madhavan: दिग्दर्शक राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) यांचा थ्री इडियट्स (3 Idiots) हा चित्रपट रिलीज होऊन 14 वर्ष झाले आहेत. तरी देखील अनेक जण आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात आमिर खान (Aamir Khan), आर. माधवन (R. Madhavan) आणि शर्मन जोशी (Sharman Joshi) यांनी प्रमुख भूमिका साकारली. थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये आर. माधवननं फरहान कुरेशी ही भूमिका साकारुन अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटामधील आर. माधवनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. या चित्रपटातील त्याला 'अब्बा नहीं मानेंगे' हा डायलॉग प्रसिद्ध आहे. या डायलॉगचे मीम्स देखील नेटकरी तयार करतात. आता या चित्रपटासाठी आर. माधवननं दिलेल्या ऑडिशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

 

19:45 PM (IST)  •  06 Feb 2023

Sidharth Malhotra, Kiara Advani: सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला जुही चावला लावणार हजेरी

Sidharth Malhotra, Kiara Advani: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जुही चावला काही वेळापूर्वी जेलमेर विमानतळावर पोहोचली. जुही चावलासोबत तिचे पती जय मेहताही अहमदाबादहून चार्टर्ड विमानाने जैसलमेरला पोहोचले. 

 
19:21 PM (IST)  •  06 Feb 2023

Shah Rukh Khan: चिमुकली म्हणते, 'पठाण नाही आवडला'; शाहरुखचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला, 'देशाच्या तरुण पिढीचा...'

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अहाना नावाच्या मुलीचा आहे. ही मुलगी व्हिडीओमध्ये 'पठाण आवडला नाही' असं म्हणत आहे. या व्हिडीओला शाहरुख खाननं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

14:15 PM (IST)  •  06 Feb 2023

Pathaan Box Office Collection Day 12 : थांबायचं नाय गड्या... पठाणची जादू कायम; 12 व्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

Pathaan Box Office Collection Day 12 : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. रिलीज आधीच या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई केली होती. हा चित्रपट रिलीज होऊन 12 दिवस झाले आहे. या चित्रपटानं रविवारी (5 फेब्रुवारी) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं 12 व्या दिवसाचं कलेक्शन...

13:38 PM (IST)  •  06 Feb 2023

Ghoda : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट 'घोडा'; ट्रेलर आऊट

Ghoda Marathi Movie : 'घोडा' (Ghoda) या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट 'घोडा' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. 

13:13 PM (IST)  •  06 Feb 2023

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकण्याआधीच शिव ठाकरेचं नशीब चमकलं

Shiv Thakare On Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सध्या चर्चेत आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातील प्रत्येक स्पर्धक खूप मेहनत घेताना दिसतो आहे. अशातच 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकण्याआधीच शिव ठाकरेचं (Shiv Thakare) नशीब उजळलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget