Entertainment News Live Updates 4 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Jan 2023 05:50 PM
Vaalvi Trailer : 'वाळवी'चा ट्रेलर क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा

Vaalvi Trailer Out : 'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' (Vaalvi) या सिनेमात  पाहायला मिळणार आहे. यापूर्वीच या सिनेमाचा जबरदस्त टिझर अगदी अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यामुळे या सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात आता 'वाळवी'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 





Bigg Boss 16 : 'बिग बॉस'च्या घरात शिव ठाकरे पुन्हा प्रेमात

Bigg Boss 16 : सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 16'ची (Bigg Boss 16) क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता हा वादग्रस्त कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दु रोजिकने (Abdu Rozik) नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.



Nawazuddin Siddiqui: 'त्यांनी मला 25 कोटी दिले तरी मी ते काम करणार नाही...'; नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करणारा  नवाजुद्दीन आता'लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन त्याच्या करिअरबाबत सांगितलं. 


संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Web Series : अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित सीरिज आवडतात? पाहा नेटफ्लिक्सवरील या पाच सीरिज

The Top 5 Action Web Series : ओटीटीवरील  (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळते. काही लोकांना रोमँटिक कथानकावर आधारित चित्रपट आवडतात तर काहींना अॅक्शन असणारे चित्रपट आवडतात. जर तुम्हाला अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित वेब आवडत असतील तर तुम्ही नेटफ्लिक्सवरील (Netflix) या पाच वेब सीरिज पाहु शकता. 


संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tunisha Sharma Birthday : जाणून घ्या तुनिषा शर्मा कसा साजरा करणार होती बर्थडे...

Tunisha Sharma : तुनिषाच्या आईने सरप्राइडज बर्थडे पार्टीच्या तयारीला सुरुवात केली होती. तुनिषाचे खास मित्र-मंडळी या पार्टीला उपस्थित राहणार होते. चंदीगढमध्ये वाढदिवस साजरा करण्याची तुनिषाची इच्छा होती. त्यामुळे चंदीगढमध्येच तिचा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. 


 

Satish Shah: "यांना फर्स्ट क्लास कसा परवडेल?"; एअरपोर्टवरील कार्मचाऱ्यांनी हिणवलं, अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली मनं

Satish Shah: प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह (Satish Shah) हे त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांच्या मनं जिंकतात. सतीश हे सध्या त्यांचा एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) हिथ्रो विमानतळावरील (Heathrow Airport) स्टाफनं अभिनेता सतीश शाह यांच्यावर एक कमेंट केली. "यांना फर्स्ट क्लास कसा परवडेल?" अशी कमेंट करत  हिथ्रो विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी सतीश यांना हिणवलं.विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या या कमेंटला सतीश यांनी प्रतिक्रिया दिली. सतीश यांनी ट्वीटच्या माध्यमातून हिथ्रो विमानतळावर त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. त्यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. तसेच अनेक नेटकरी त्यांच्या या ट्वीटचं कौतुक करत आहेत. 





Rang Maza Vegla : दीपा-कार्तिकचा थाटात पार पडणार विवाहसोहळा

Rang Maza Vegla Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. आता या मालिकेत लगीनघाईला सुरुवात झाली आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. 



Genelia Deshmukh: 'टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं...'; जिनिलियाची खास पोस्ट

Genelia Deshmukh: अभिनेत्री  जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि तिचा पती अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलिया आणि रितेश हे गेली 20 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. चित्रपटातील गाणी, चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील एका सिनचा व्हिडीओ जिनिलियानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यामातून जिनिलियानं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 





Pathaan Trailer Leaked : रिलीजआधीच 'पठाण'चा ट्रेलर लीक

Shah Rukh Khan Pathaan Trailer : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. आतापर्यंत या सिनेमातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधीच ऑनलाइन लीक झाला आहे. 



Sonam Kapoor: सोनम कपूरनं विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची झाली डील

Sonam Kapoor: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनमच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगम झाले. आनंद आहुजा आणि सोनमनं त्यांच्या मुलाचं नाव वायु असं ठेवलं. सोनमनं नुकतच तिचं मुंबईमधील  (Mumbai) आलिशान घर विकलं आहे. या घराची डील झाल्यानं सोनमला फायदा झाल आहे.



Nysa Devgan : 'हा' आहे अजय देवगणच्या लेकीचा बॉयफ्रेंड? न्यासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, फोटोत दिसणारा तरुण नक्की आहे तरी कोण?

Nysa Devgan Rumored Boyfriend : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan)आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची लेक न्यासा देवगण (Nysa Devgan) न्यू इयर पार्टीमध्ये मित्रांसोबत दुबईमध्ये मज्जा करताना दिसली. यामधील एका तरुणाची न्यासासोबतची जवळीक प्रचंड चर्चेत आहे. न्यासा देवगणअलिकडे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. न्यासा देवगण प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. न्यासाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. न्यू इअर पार्टीतील अजय देवगणच्या लेकीचा बोल्ड लूक सध्या मीडियावर व्हायरल होत आहे. 



Urfi Javed: 'मी पण भाजपमध्ये प्रवेश करते, मग...'; उर्फीनं पुन्हा साधला चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

Urfi Javed: अभिनेत्री  उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं.  'उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा' अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फी ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा सधात आहे. नुकतीच उर्फीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


पाहा पोस्ट: 





Supreme Court : चित्रपटगृहात प्रेक्षक खाद्यपदार्थ घेऊन जाऊ शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Supreme Court : चित्रपट Movie) पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपगृहात (Movie Theater) जातात. चित्रपगृहात चित्रपट बघताना पॉपकॉर्न (Popcorn), समोसा असे खाद्य पदार्थ लोक खातात.  याच खाद्य पदार्थांसंबंधित एक महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे.  भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court)  खंडपीठाने 3 जानेवारी रोजी नमूद केले की, 'सिनेमा हॉल ही थिएटर मालकांची मालमत्ता आहे. त्यामुळे चित्रपट बघायला जाताना प्रेक्षक अन्न आणि पेय थिएटरमध्ये घेऊन जाऊ शकतात की नाही? याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे.'



Prathamesh Parab: प्रथमेश परबची खास पोस्ट; म्हणाला, 'या दिवसानं माझं आयुष्य बदललं...'

Prathamesh Parab: अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा त्याच्या अभिनयानं  नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रथमेशच्या चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. नुकतीच प्रथमेशनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Pathaan : शाहरुख खान 'पठाण'ची रिलीज डेट बदलणार?



KRK On Pathaan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता किंग खान या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


Tunisha Sharma : तुनिषाच्या निधनानंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेचा सेट बदलला



Ali Baba Dastaan E Kabul : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) या मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. तुनिषाने या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याने सेटवर भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. पण शूटिंग थांबल्याने निर्मात्यांना मात्र मोठा फटका बसला होता. पण आता शो मस्ट गो ऑन म्हणत या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 


Akshaya Deodhar : अक्षयाची रिअल लाईफ सासू दिसते कशी? जाणून घ्या...


Akshaya Deodhar : अक्षया देवधर (Akshaya Deodhar)


आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर पाठकबाईंची खऱ्या आयुष्यातील सासू नक्की कशी आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 


अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण यातील एका फोटोने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोत अक्षयासोबत एक महिला दिसत आहे. त्यामुळे आता ही महिला कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून अक्षयाची सासू आहे.


Nawazuddin Siddiqui: 'त्यांनी मला 25 कोटी दिले तरी मी ते काम करणार नाही...'; नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष


Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेतानवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करणारा  नवाजुद्दीन आता'लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन त्याच्या करिअरबाबत सांगितलं. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.