Entertainment News Live Updates 4 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'टाइमपास 3'ची कमाल; चार दिवसांत कमवला 4.36 कोटींचा गल्ला
'टाइमपास' आणि 'टाइमपास 2'च्या यशानंतर आता 'टाइमपास 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. नुकतेच या सिनेमाचे कलेक्शन समोर आले आहे. या सिनेमाने 4.36 कोटींची कमाई केली आहे.
'शेर शिवराज'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
'शेर शिवराज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना 'लाल सिंह चड्ढा'चे नवे पोस्टर आऊट
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होत असताना सिनेमावर बहिष्कार मागणी होत आहे. अशातच या सिनेमाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
गजेंद्र अहिरेंची 'साजिंदे' वेबसिरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीस
दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. बाईतल बाईपण प्रभावीपणे मांडणार संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असत त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे होय. दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर गजेंद्र अहिरेंनी मोर्चा वळवला आहे तो वेबसिरीजकडे. चित्रपटाच्या कथेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी जी धडपड त्यांची असते तीच धडपड एक कथानक वेबसिरीजमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास गजेंद्र अहिरेंनी प्रयत्न केले आणि 'साजिंदे' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली.
मराठी रॅपर ‘किंग जेडी’कडून ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना
मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॅाप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे.
Neel Salekar : 'सोशल मीडिया स्टार' नील सालेकरकडून चाहत्यांना खास गिफ्ट
Neel Salekar : सोशल मीडियावरील (Social Media) स्टार असणारा नील सालेकर (Neel Salekar) हा इन्स्टाग्रामवर नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळा कंटेन्ट घेऊन येत असतो. त्या नीलचं एक भन्नाट गाणं रिलीज झालं आहे.
अनुपम खेर यांनी घेतली एस.एस राजामौली यांची भेट
View this post on Instagram
'केसरिया' नंतर ब्रह्मास्त्रमधील 'देवा देवा' गाणं होणार रिलीज; पाहा टीझर
Deva Deva Song Teaser : प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील केसरिया (Kesariya) हे गाणं 17 जुलै रोजी रिलीज झालं. आता या चित्रपटामधील 'देवा देवा' (Deva Deva) या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये रणबीर, आलियाला आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे दिसत आहेत.
Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' मध्ये पुन्हा झळकणार 'कलरफुल' पूजा सावंत
Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती ती, यात कोणते चेहरे झळकणार? हळूहळू हे चेहरे गुलदस्त्याबाहेर येऊ लागले असून आता प्रेक्षकांसमोर कलरफुल सोनल म्हणजेच पूजा सावंतची व्यक्तिरेखा समोर आली आहे. त्याच्यबरोबर सूर्या आणि सोनलच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर आता अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ बसले आहे. 'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळणार आहे. नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून एक कौटुंबिक कहाणी यात पाहायला मिळणार हे नक्की.
पाहा पोस्टर
View this post on Instagram
उर्फी जावेदनं शेअर केले हॉ लूकमधील फोटो
View this post on Instagram