Entertainment News Live Updates 30 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Allu Arjun Net Worth : आलिशान घर...महागड्या गाड्या; अल्लू अर्जुन कोट्यवधींचा मालक
Allu Arjun Net Worth : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या दोन दशकांपासून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. अल्लू अर्जुन 350 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटी आहे. तसेच तो एका सिनेमासाठी 10 कोटी मानधन घेतो. अल्लू अर्जुन जाहिरातींमधून खूप पैसे कमावतो. एका जाहिरातीसाठी तो चार कोटी रुपये आकारतो. त्याची वर्षभराची कमाई 24 कोटींच्या आसपास आहे. हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनचं आलिशान घर आहे. या घराची किंमत 100 कोटींच्या आसपास आहे.
Parineeti Chopra and Raghav Chadha : आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर परिणीतीनं दिली अशी रिअॅक्शन; व्हिडीओ व्हायरल
Parineeti Chopra and Raghav Chadha : आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. बुधवारी (22 मार्च) हे दोघं एकत्रित डिनर करताना दिसून आले होते, त्यानंतर काही दिवसांनी लंचसाठी देखील ते एकत्र गेले होते. परिणीती आणि राघव हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे. आता नुकताच एका फोटोग्राफरनं परिणीतीला राघव चड्ढा यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. राघव चढ्ढा यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर परिणीतीनं खास रिअॅक्शन दिली आहे.
Kangana Ranaut : ओटीटी नाही तर छोट्या पडद्यावर पाहता येणार कंगनाचा 'लॉक अप 2'; यंदा कोण होणार कैद?
Shiv Thakare On Casting Couch: शिव ठाकरेला करावा लागला कास्टिंग काऊचचा सामना; म्हणाला, 'तो मला बाथरुममध्ये...'
Shiv Thakare On Casting Couch: 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) या शोमुळे शिव ठाकरेला (Shiv Thakare) विशेष लोकप्रियता मिळाली. शिव हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. शिव हा अमरावतीचा आहे. अमरावतीमधून मुंबईला येऊन शिवनं मनोरंजनक्षेत्रात विशेष लोकप्रिया मिळवली. पण शिवनं करिअरच्या सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला. शिवला कास्टिंग काऊचचा देखील सामना करावा लागला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवनं कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला.
Maidaan Teaser: 'मैदान में उतरेंगे...'; अजयच्या मैदानचा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस
Maidaan Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. नुकताच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता त्याचा मैदान हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. अजयनं सोशल मीडियावर मैदान या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
View this post on Instagram
Suhana Khan And Agastya Nanda: बिग बींच्या नातवाला डेट करतीये शाहरुखची लेक? सुहाना आणि अगस्त्यचा व्हिडीओ व्हायरल
Suhana Khan And Agastya Nanda: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शहरूख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहानाचं नाव सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदासोबत (Agstya Nanda) जोडलं जात आहे. नुकताच सुहाना आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अगस्त्य आणि सुहाना केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
Adipurush: 'मंत्रों से बढके तेरा नाम, जय श्री राम'; राम नवमीनिमित्त 'आदिपुरुष' चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज
Adipurush: आज (30 मार्च) देशभरात राम नवमी (Ram Navami) उत्साहानं साजरी केली जात आहे. आज राम नवमी दिवशी अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचं नवं पोस्ट प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) आदिपुरुष या चित्रपटाचं हे नवं पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
Ponniyin Selvan 2 Trailer Out: सिंहासनासाठी होणार युद्ध; अंगावर शहारे आणणारा पोन्नियन सेल्वन 2 चा ट्रेलर झाला रिलीज
Ponniyin Selvan 2 Trailer Out : गेल्या वर्षी रिलीज झालेला 'पोन्नियन सेल्वन-1' (Ponniyin Selvan 1) हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग (Ponniyin Selvan 2) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या पोन्नियन सेल्वन 2 (Ponniyin Selvan 2) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमध्ये ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता विक्रमचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.