Entertainment News Live Updates 30 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान अशोक सराफ म्हणाले, आम्ही चांगले सिनेमे देण्याचा प्रयत्न करतो मात्र काही फसतात. प्रेक्षक कमी झालेले नसून त्यांच्याकडे ऑप्शन वाढले आहेत.
नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान सचिन पिळगावकर म्हणाले, ओटीटीमुळे काही फरक पडत नाही. रिजनल सिनेमांवर अजूनही विश्वास आहे. या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. याचे उत्तम उदाहरण पुष्पा हा सिनेमा आहे. ओटीटी मुळे काही फरक पडत नाही.
Akshay Kumar Ram Setu Controversy : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'राम सेतु' (Ram Setu) या सिनेमामुळे चर्चेत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी खिलाडी कुमार आणि राम सेतु सिनेमावर निशाणा साधला आहे. सुब्रमण्यम स्वामी अक्की यांनी राम सेतू या सिनेमात चुकीचे तथ्य मांडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि राम सेतुच्या टीमवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकताच या मालिकेचा विशेष भाग पार पडला. या भागात अविनाशचं सत्य नेहासमोर आलं. मालिकेत अविनाश सध्या कॅन्सर झाल्याचं नाटक करत आहे.
Shah Rukh Khan Jawan Teaser : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'एक विलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमादरम्यान शाहरुखच्या 'जवान'चा टीझर दाखवण्यात आला. 'जवान' सिनेमाची शाहरुखच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'जवान'चा टीझर पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमागृहात वाजवल्या शिट्ट्या वाजवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rashtra movie : प्रत्येक चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत राहतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो, पण काही चित्रपट मात्र एक ना अनेक कारणांमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात. 'राष्ट्र - एक रणभूमी' हा असाच एक आगामी मराठी चित्रपट आहे, ज्यानं आपल्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांच्या बळावर सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. महामारीमुळं लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असलेला हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मनामनांत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारं टायटल असणारा 'राष्ट्र' (Rashtra) हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी रसिक दरबारी सादर होणार आहे.
Bigg Boss 16 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा बिग बॉस (Bigg Boss) या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमाच्या अपकमिंग सिझनची म्हणजेच 16 व्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सिझनचे सूत्रसंचालन देखील सलमानच करणार आहे. बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान किती मानधन घेतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात सलमानच्या मानधनाबाबत...
Chitrangda Singh : अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangda Singh) ही तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. चित्रांगदा ही अभिनयाबरोबरच चित्रपटांची निर्मिती देखील करते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुरमा या चित्रपटामधून तिनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचे कथानक हॉकी खेळाडू संदीप सिंह (Sandeep singh) यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये तापसी पन्नू (Taapse Paanu) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) या कलकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता चित्रांगदा आणखी एका व्यक्तीची प्रेरणादायी कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
Shakira Tax Case : पॉप सिंगर शकीरानं (Shakira) तिच्या 'वाका वाका' गाण्यातून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. पण शकीरावर आता टॅक्स चोरीचा आरोप करण्यात आला आहे. तिच्यावर करण्यात आलेल्या या आरोपामुळे तिला आठ वर्षाची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते. शुक्रवारी (29 जुलै) स्पेनच्या एका सरकारी वकीलानं शकीराला आठ वर्षाची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. या सरकारी वकीलानं शकीरावर टॅक्स चोरीचा आरोप लावला आहे. शकीरानं टॅक्स चोरीची याचिका फेटाळून लावली होती. 24 मिनियन यूरो (2.4 कोटी) फाइन शकीरानं भरावा, अशी देखील मागणी या सरकारी वकीलानं केली आहे. जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण...
Indian Matchmaking 2 Trailer Out : नेटफ्लिक्सचा (Netflix) लोकप्रिय आणि वादग्रस्त शो 'इंडियन मॅचमेकिंग सीझन 2' (Indian Matchmaking 2) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या शोद्वारे सीमा आंटी पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. या शोमध्ये सीमा आंटी (Sima Taparia) उर्फ सीमा तपारिया यांचा रोल खास आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला त्या काही जोडप्यांचे लग्न ठरवताना दिसत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या ट्रेलरवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा सीझन पहिल्या सीझनपेक्षा चांगला असेल, असं काहींचे मत आहे. तर काहींना ट्रेलरला नापसंती दर्शवली आहे.
मुंबईच्या अंधेरी पश्चिम (Andheri Fire) भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे. चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) आगामी सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता. सेटवर लायटिंगचे काम सुरू असताना आग लागली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर आगीत राजश्री प्रॉडक्शनचा सेट देखील खराब झाला आहे.
Sonu Sood Birthday : अभिनेता सोनू सूदचा (Sonu Sood) आज 49 वा वाढदिवस आहे. सोनू हा रिल लाईफबरोबरच रिअल लाईफ हिरो आहे, असं त्याच्या चाहत्यांचे मत आहे. सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली. 30 जुलै 1973 रोजी पंजाबमधील मोगा येथे सोनूचा जन्म झाला. सोनूनं नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. इंजिनीअरिंग करत असताना त्याच्यामध्ये अभिनय आणि मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर तो मुंबईमध्ये आला. जाणून घेऊयात सोनूबाबत काही खास गोष्टी....
Ek Villain Returns Collection Day 1 : गेल्या काही दिवसांपासून 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) चित्रपटाची स्टार कास्ट या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. जॉन अब्राहम (John Abraham), दिशा पाटनी (Disha Patani), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) या कलाकारांनी या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. मोहित सूरीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. काल (29 जुलै) 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पाहूयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन....
Rasik Dave : अभिनेते रसिक दवे (Rasik Dave) यांचे काल (29 जुलै) निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) यांचे पती रसिक दवे यांचे किडनी खराब झाल्यानं निधन झालं. रसिक दवे यांना 15 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (30 जुलै) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Disha-Tiger Breakup: दिशा आणि टायगरचं झालं ब्रेकअप? जॅकी श्रॉफ म्हणाला...
Disha-Tiger Breakup : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणारी दिशा पटानी (Disha patani) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असतात. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किंवा कार्यक्रमांमध्ये दिशा आणि टायगरनं त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं. सध्या या दोघांचं ब्रेक-अप झालं आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोघे जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. दिशा आणि टायगरच्या ब्रेक-अपच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
Alia Bhatt On Twins : रणबीर कपूरनं जुळ्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्यावर आलियाची रिअॅक्शन; म्हणाली...
Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रणबीरनं दिलेल्या एका उत्तरामुळे त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. रणवीरच्या जुळ्या मुलांच्या वक्तव्यावर आता आलियानं प्रतिक्रिया दिली आहे.
Pathaan Poster : प्रतीक्षा संपली; 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लुक आऊट
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच 'पठाण' सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) फर्स्ट लुक आऊट झाला आहे. दीपिका पदुकोणचा 'पठाण' सिनेमातील लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात दीपिका अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे. दीपिकाचा एक वेगळी लुक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दीपिका लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने दीपिकाचा लुक शेअर करत लिहिलं आहे,"तिला केवळ गोळीने घायाळ करण्याची गरज नाही".
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -