Andheri Fire : अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना
Andheri Fire : मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे.
![Andheri Fire : अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना Andheri Fire Massive Fire Breaks Out In Mumbai shop D N Nagar behind Andheri Sports Complex Andheri Fire : अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/abb2790d15c311d18dc86730f27bbbcf1659094917_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Andheri Fire : मुंबईच्या अंधेरी पश्चिम (Andheri Fire) भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या आहेत. सिनेमाच्या सेटमधील बहुतांश सामान ज्वलनशील असल्याने आग वेगानं पसरली आहे.
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत चित्रकूट सेटवर लागली मोठी आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना#AndheriFire #mumbaihttps://t.co/DItEKd8EsK
— ABP माझा (@abpmajhatv) July 29, 2022
आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला असून सध्या त्या सेटवर किती लोक अडकले आहेत, किती जणांची सुटका करण्यात आली आहे, ही माहिती समोर आलेली नाही. मात्र आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. फिल्म शूटिंगच्या स्टुडिओ असल्यामुळे आग वेगाने पसरली. या आगीमध्ये संपूर्ण फिल्म शूटिंगचे स्टुडिओ जळून खाक झाले आहे. आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आगीचे वृत्त कळताच परिसरात बघ्यांची गर्दी वाढली. स्टुडिओमधील सेट प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा होता, त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली.
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाच्या सेटला आग
प्राथमिक माहितीनुसार, चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) आगामी चित्रपट 'लव रंजन'चा सेट उभारण्यात आला होता. सेट वर लाईटिंगचे काम सुरू होते त्यावेळी आग लागली आहे. पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार होती. शेजारी राजश्री फिल्मचे दोन सेट होते. त्याला आग लागलेली नाही. या घटनेत राजश्रीच्या सेटवरील कोणालाही दुखापत झाली नाही. चित्रपटाचे शूटिंग थांबवून कलाकार-क्रूला घरी पाठवण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव निश्चित नसून काही दिवसापूर्वी त्याचे शुटिंग पॅरिसला झाले. सेटचे काम सुरू असल्याने मोठ्या संख्या मध्ये कामगार आगीमध्ये अडकल्याचा अंदाज आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)