Entertainment News Live Updates 30 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Aug 2022 11:21 PM
Thor Love And Thunder : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' ओटीटीवर होणार रिलीज

Thor Love And Thunder On OTT Release : हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थ (Chris Hemsworth) गेल्या काही दिवसांपासून 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love And Thunder) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

“मला आदित्य चोप्राचा अभिमान आहे..” अनुपम खेर यांनी दिले अनुराग कश्यपच्या टीकेला उत्तर

अनुराग कश्यपने यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रांवर टीका केली होती. “आदित्य चोप्रा चित्रपटाच्या प्रत्येक विभागावर नियंत्रण ठेवतात. ते निर्मात्यांवर अनेक बंधने लादून त्यांना असक्षम बनवतात.” असा दावा अनुरागने केला होता. या विधानावरुन अनुपम खेर यांनी अनुरागला खडे बोल सुनावले आहेत. “मला आदित्य चोप्राचा खूप, खूप अभिमान आहे. यशजींचे कुटुंब मला माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे. यशराज फिल्म्स सारखे साम्राज्य तयार करणे सोपी गोष्ट नाहीये’ असे म्हणत त्यांनी आदित्यची पाठराखण केली आहे. तसेच त्यांनी “अनुराग कश्यपला कोणी कसे वागावे हे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला ?” असं म्हणत खडे बोल सुनावले.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश-नेहाच्या नात्यात दुरावा

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच मालिकेत आता नवा ट्विस्ट आला आहे. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य यशसमोर आल्याने आता यश-नेहाच्या नात्यात दुरावा आला आहे.

Monica O My Darling Teaser : 'मोनिका ओ माय डार्लिंग'चा टीझर आऊट

Monica O My Darling Teaser Released : बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा (Rajkummar Rao) आगामी सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'मोनिका ओ माय डार्लिंग' (Monica O My Darling) असे या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 





Jogi Trailer : दिलजीत दोसांझच्या 'जोगी' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज; 1984 मधील दंगलीवर आधारित चित्रपटाचे कथानक

Pushpa : गणेशोत्सवातही साऊथच्या सिनेमांची क्रेझ, पुष्पा स्टाईल गणेश मुर्त्यांची बाजाराला भुरळ

Ganesh Utsav 2022 : गणपती बाप्पाच्या आगमनाची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. मखर, सजावट, फुलांचा हार, प्रसाद अशा अनेक गोष्टींची सध्या घरोघरी तयारी सुरू आहे. दोन वर्षांनंतर बाप्पाचं थाटामाटात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे सजावटीचे वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. आजही सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. कारण गणेशोत्सवात 'पुष्पा' स्टाइल बाप्पाची मुर्ती बनवण्यात आली आहे.

Sara Ali Khan : 'या' क्रिकेटरला डेट करतीये सारा? व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Sara Ali Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. कॉफी विथ करण या शोमध्ये सारानं तिच्या क्रशबाबत सांगितलं होतं.  पण अभिनेत्याला नाही तर सारा एका क्रिकेटरला डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. साराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Shubhman Gill)  दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सारा आणि शुभमन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 



कुणी स्वतःच्या हाताने गणपती घडवतं, तर कुणी मोदकांची वाट बघतं! लाडके कलाकार सांगतायत बाप्पाच्या आठवणी

सगळे जण ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत, अशा सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार असून, झी मराठीवर येत असलेल्या नवीन मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपा परब, धनश्री काडगावकर, शिवानी नाईक आणि अभिनेता रोहित परशुराम यांनी आपआपल्या घरी गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) कसा साजरा केला जातो, या बद्दलच्या आपल्या आठवणी सांगितल्या केल्या आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय, 'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' (Raada) चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच हवा केलीय. प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.


 


तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय, 'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' (Raada) चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच हवा केलीय. प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.


 


मालिका विश्वात बाप्पाचं थाटात होणार आगमन, पारंपरिक पद्धतीने साजरा करणार गणेशोत्सव!

गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण वर्षभर वाट पहात असतो. त्याच्या आगमनाने संपूर्ण आसमंत भारुन जातो. मालिका विश्वातही यंदा गणपती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे.


 





प्रदर्शनाआधीच ‘रामसेतू’ मोठ्या वादात, सुब्रमण्यम स्वामींकडून अक्षय कुमारसह 8 कायदेशीर नोटीस!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) अगामी चित्रपट ‘राम सेतू’ (Ram Setu) भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटात चुकीची माहिती देत चित्रण केल्याचा आरोप करत सुब्रमण्यम स्वामी यांनी अक्षय कुमारसह (Akshay Kumar) 8 जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या चित्रपटात केलेल्या चित्रणामुळे रामसेतू्च्या प्रतिमेला धक्का लागला आहे, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.


 





'चोर निकल के भागा' चित्रपटाची घोषणा; नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

सारा अली खानच्या मनमोहक लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

क्रितीचं बोलणं ऐकून उडाला करणच्या चेहऱ्याचा रंग!

बाबिल खान 'काला' मधून अभिनय क्षेत्रात करणार पदार्पण; नेटफ्लिक्सवर रिलीज होणार चित्रपट

अभिनेता कमाल आर. खान उर्फ केकेआरला अटक

अभिनेता कमाल आर. खानला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. 2020 मधील वादग्रस्त ट्विटप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.





पहिल्या आठवड्यात 50 कोटींचा टप्पाही गाठू शकत नाही ‘लायगर’, पाचव्या दिवशी अवघी ‘इतकी’ कमाई!

मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी ‘लायगर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये (Liger Box Office Collection) मोठी घसरण झाली आहे. चित्रपटाने पाचव्या दिवशी अवघ्या 2.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. रविवारीही भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. विजयच्या या चित्रपटाच्या कलेक्शनवर या सामन्याचा मोठा प्रभाव पडला होता.




 






‘पान मसाल्या’ची जाहिरात करण्यास कार्तिक आर्यनचा नकार! अभिनेत्याने नाकारली ‘इतक्या’ कोटींची ऑफर

‘भूल भुलैया 2’च्या यशानंतर कार्तिकला आपल्या चित्रपटात किंवा जाहिरातीत सामील करण्यासाठी मनोरंजन विश्वातील अनेक निर्माते रांगेत तयार आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनने एका मोठ्या पान मसाला कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीच्या डीलला स्पष्टपणे नकार दिला आहे.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह पोलिसांसमोर हजर


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचे न्यूड फोटोशूट प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली होती. या प्रकरणी अभिनेत्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, रणवीरने दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. अखेर आज (29 ऑगस्ट) रणवीर सिंह पोलिसांसमोर हजर झाला आहे. चेंबूर पोलिसांनी रणवीर सिंह याचा जबाब नोंदवला आहे.


केतकी चितळेचं फेसबुकवर कमबॅक


अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे केतकीला तुरुंगवास भोगावा लागला होता. तसेच तिला तिच्या फेसबुक अकाऊंटचा वापर करण्यालाही मनाई करण्यात आली होती. पण आता तिला तिचं फेसबुक अकाऊंट परत मिळाले आहे.


'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा


'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावल्या आहेत. आता या मालिकेत उत्कर्ष शिंदे संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.


अमिताभ बच्चन यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीतदेखील सुधारणा होत आहे. अमिताभ यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.


'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट


'बिग बॉस मराठी'च्या चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झालाय. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर  राग शांत करण्याच्या 101 उपायांविषयी बोलत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.