10 percent water reduction in Mumbai मुंबई: मुंबईत आजपासून (1 डिसेंबर) पुढील पाच दिवस (5 डिसेंबर) 10 टक्के पाणी कपात (Water reduction in Mumbai) करण्यात येणार आहे. पिसे येथील 'न्यूमॅटिक गेट सिस्टीम' मध्ये बिघाड झाल्याने याचा मुंबई शहर व उपनगरासह ठाणे, भिवंडीतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे महापालिकेने 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेस (Mumbai Muncipal Corporation) पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. सदर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी लोअर परळ येथील तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे शहर भागातील अनेक विभागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यानंतर आता पिसे येथे बिघाड निर्माण झाला आहे. 


मुंबई महापालिकेचं महत्वाचं आवाहन-


बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये आज बिघाड झाला आहे. हे तांत्रिक दुरुस्तीचे काम 01 डिसेंबर 2024 ते दिनांक 02 डिसेंबर 2024 रोजी हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर - उपनगर, ठाणे व भिवंडी भागाला  होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यास्तव दिनांक 01 डिसेंबर 2024 ते दिनांक 05 डिसेंबर 2024 या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात करण्यात येणार आहे. नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून उपरोक्त नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. 






मुंबईत 10 टक्के पाणी कपात, VIDEO:



संबंधित बातमी:


Mumbai Crime : ह्रदयद्रावक! विकासकामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, आईने टाहो फोडला