Mumbai Local Mega Block Updates: मुंबईकरांनो (Mumbai News) आज नव्या महिन्याचा पहिला दिवस आणि त्यात रविवार... आज कुठे फिरायला जाण्याचा प्लान केला असेल किंवा काही खरेदीसाठी जात असाल तर थांबा आणि सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहा. कारण, आज मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वेवर (Harbor Railway) मेगाब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. या काळात सीएसएमटी ते वाशी या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. बेलापूर/नेरुळ आणि उरण बंदर मार्गादरम्यान सेवा सुरू राहील. ब्लॉक दरम्यान लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणी येऊ शकतात.

मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर ब्लॉक

CSMT ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटीवरून सकाळी 10:48 ते दुपारी 3:18 पर्यंत धावणाऱ्या डाऊन स्लो लोकल विद्याविहारपर्यंत डाऊन फास्ट मार्गावर वळवल्या जातील, भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शेओ आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि नंतर विद्याविहार इथून स्लो लाईनवर परत जातील. घाटकोपरहून सकाळी 10:19 ते दुपारी 3:19 पर्यंत धावणाऱ्या अप धीम्या लोकल कुर्ला, सीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबून विद्याविहार ते सीएसएमटी या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Continues below advertisement

हार्बर लाईन ब्लॉक

पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत मेगाब्लॉक असेल. सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 पर्यंत पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी अप हार्बर लोकल आणि सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरकडे जाणारी डाऊन हार्बर लोकल सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 या वेळेत रद्द राहतील. 

ट्रांस-हार्बर लाईन ब्लॉक

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सुटणारी पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

आज रात्रीपासून रेल्वे तिकीट आरक्षण बंद 

आरक्षण प्रणालीच्या देखभालीसाठी रेल्वे स्थानकांवरील आरक्षण तिकीट खिडक्या रविवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत बंद राहतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 'डेटाबेस कॉम्प्रेशन' कामासाठी प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) आणि कोचिंग रिफंडशी संबंधित सेवा 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 23:45 ते 1 डिसेंबर रोजी पहाटे 3:15 पर्यंत बंद राहतील. या कालावधीत, IVRS, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन सेवा, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल देखील बंद राहतील. इंटरनेट बुकिंग देखील उपलब्ध होणार नाही. मात्र, सध्याच्या नियमांनुसार प्रवाशांना रिफंडसाठी टीडीआर (तिकीट जमा पावती) दिली जाईल.