Entertainment News Live Updates 3 June: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jun 2022 02:18 PM
Zol Zaal : मल्टीस्टारर 'झोलझाल' सिनेमाचे पोस्टर आऊट; 1 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित

Zol Zaal : 'झोलझाल' (Zol Zaal) हा चित्रपट 1 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता चित्रपटाची गाणी आणि टीझर देखील रिलीज झाला आहे. 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'झोलझाल' हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन येत्या 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


वाचा संपूर्ण बातमी 

Salman Khan Trolled : गिफ्ट देणाऱ्या चाहत्यालाच तोंड वाकडं करून दाखवलं! सलमान खान सोशल मीडियावर होतोय ट्रोल! पाहा Video

Salman Khan Trolled : ‘दबंग’ अभिनेता सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्याचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो. मात्र, यावेळी एका चाहत्याला भेटल्यानंतर सलमान खान जोरदार ट्रोल होतोय. नुकताच सलमान खान मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी त्याने मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर पोझही दिली. मात्र, यादरम्यान सलमान खानने त्याच्या एका चाहत्यासोबत असे काही केले की, लोक आता त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

Samrat Prithviraj : सरसंघचालक मोहन भागवत ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट पाहणार, स्पेशल स्क्रीनिंगला लावणार हजेरी

Samrat Prithviraj : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट आज (3 जून) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या दिल्लीतील स्पेशल स्क्रीनिंगला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) हजेरी लावणार आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर अभिनीत या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासह मोहन भागवत देखील उपस्थित राहणार आहेत.


यशराज फिल्म्सचा पहिला ऐतिहासिक चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ निर्भयी आणि पराक्रमी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आणि पराक्रमावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महान योद्धा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांची भूमिका साकारत आहे. सम्राट पृथ्वीराज यांच्या धैर्याने आणि नेतृत्वाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट रिलीज, बॉक्स ऑफिसवर दिसणार का अक्षय कुमारची जादू?

Samrat Prithviraj : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट आज (3 जून) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र, रिलीजपूर्वीच या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागला, त्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे नाव बदलावे लागले होते. यासोबतच अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू शकेल का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.


चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगचा अहवाल समोर आला आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत संथ सुरुवात झाली आहे. ही कमाई कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’पेक्षा कमी आहे. या चित्रपटाची आतापर्यंत केवळ 10 हजार तिकिटे विकली गेली आहेत, जी निराशाजनक आकडेवारी आहे. नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’च्या रिलीजपूर्वी 30 हजार तिकिटांची विक्री झाली होती. अशा परिस्थितीत अक्षयचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकणार नाही, असा अंदाज व्यापार तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

Lokesh Kanagaraj : ‘विक्रम’नंतर त्याचा सिक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Lokesh Kanagaraj : साउथ दिग्दर्शक लोकेश कनगराजचा (Lokesh Kanagaraj) बहुचर्चित ‘विक्रम’ (Vikram) आज (3 जून) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'विक्रम' हा संपूर्ण पॅन इंडिया चित्रपट असून तो तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक मल्टिस्टारर असल्यामुळे या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या चित्रपटात कमल हासन, फहाद फासिल आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


यापूर्वी अशी चर्चा रंगली होती की, कमल हासन 'विक्रम' या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती करत आहे, ज्यात अभिनेता सुर्या मुख्य भूमिकेत असेल. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आजे की, लोकेश कनगराज लवकरच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे ज्यात कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसणार असून, सुर्या, कार्ती हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुर्याच्या कॅमिओ भूमिकेबरोबरच, 'विक्रम'च्या क्लायमॅक्समध्ये कार्तीच्या व्हॉईस ओव्हर नेरेशनने लोकेश कनगराजच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे.

सिद्धू मुसेवाला यांच्या किडनी, यकृतासह 19 ठिकाणी गोळ्यांच्या जखमा, पोस्टमॉर्टम अहवालातून उघड

Sidhu Moose Wala Postmortem Report : प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुसा गावामध्ये मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांच्या पोस्टमार्टम अहवालातून त्यांच्या मृत्यू संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा असल्याचं समोर आलं आहे. तसेच जखमी झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचं अहवालात उघड झालं आहे.


पोस्टमार्टम अहवालातून समोर आलं आहे की, सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर 23 जखमांच्या खुणा होत्या. किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी गेळी लागली होती. 14 ते 15 गोळ्या शरीराच्या पुढच्या भागावर लागल्या होत्या. तर तीन ते चार गोळ्या त्यांच्या उजव्या हाताच्या कोपरावर लागल्या होत्या. त्यांच्या शरीरावर तीन ते पाच सेंमीपर्यंतच्या जखमा आढळल्या आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

शाहिद कपूर देणार बप्पी दांना सांगीतिक श्रद्धांजली!

IIFA Awards 2022 : यंदाच्या ‘आयफा अवॉर्ड्स 2022’मध्ये (IIFA 2022) शाहिद कपूर (Shahid Kapoor) परफॉर्म करणार असून, यासाठी तो अबुधाबीला पोहोचला आहे. याच ठिकाणी IIFA 2022चा कार्यक्रम होणार आहे. शाहीद ‘आयफा 2022’मध्ये दिवंगत गायक बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांना श्रद्धांजली वाहणार आहे. याबाबतचा खुलासा खुद्द शाहिदने पत्रकार परिषदेत केला आहे. नुकत्याच एका पत्रकार परिषदेदरम्यान शाहिद कपूरला विचारण्यात आले की, तो यावेळी या सोहळ्यात काय खास काय करणार आहे?


यावर उत्तर देताना तो म्हणाला की, हे वर्ष खूप खास असणार आहे. कारण यावेळी तो त्याच्या गाण्यांवर परफॉर्म करणार नाही. मात्र, तो दिवंगत गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या गाण्यांवर सादरीकरण करणार आहे. यासाठी तो अबुधाबीच्या यास आयलंडला पोहोचला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

प्रभासच्या ‘आदिपुरुष’वर खर्च झाले ‘इतके’ कोटी, मेकिंग बजेटच्याबाबतीत ‘बाहुबली’लाही टाकले मागे!

Adipurush : मनोरंजन विश्वाचा ‘बाहुबली’ अर्थात प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट 'आदिपुरुष'(Adipurush) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी या प्रभासने बिग बजेट ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’मध्ये काम केले होते, ज्याचे बजेट सुमारे 450 कोटी रुपये होते. मात्र, आता समोर आलेल्या बातम्यांनुसार, प्रभासचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट होण्याचा मान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट तब्बल 500 कोटी रुपयांच्या तगड्या बजेटवर बनवला जात आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Santoor Maestro Pandit Bhajan Sopori : प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन


Santoor Maestro Pandit Bhajan Sopori : जगप्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी (Santoor Maestro Pandit Bhajan Sopori) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संतूर वादक पंडित भजन सोपोरी आजारी होते. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 


संतूर वादक शिवकुमार शर्मा आणि आता संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे निधन झाल्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पंडित भजन सोपोरी यांना राष्ट्रीय कालिदास पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. संतूर वादक पंडित भजन सोपोरी हे सोपोरी सुफियाना घराण्यातील होते. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते.


संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंडित भजन सोपोरी यांना संतूरपासून ते सतारपर्यंत सर्वकाही वाजवता येत होते. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीदेखील घेतली आहे.


संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांनी महान उस्ताद पंडित शंकर पंडित जी यांच्याकडून संगीताचा वारसा घेतला आहे. संतूरला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी 1990 च्या दशकात संतूरसह जगभरात सादरीकरण करण्यास सुरुवात केली होती. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.