Entertainment News Live Updates 3 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Savitribai Phule : समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री सावित्रीबाई फुले (Savitribai Phule)यांची आज जयंती आहे. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. स्त्री शिक्षणाबाबत त्यांनी समाजात जागृती केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अनेक अभिनेत्रींनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका लिलया पार पाडली आहे.
Urfi Javed: 'जेव्हा ती सापडेल, त्या दिवशी तिचं थोबाड रंगवेन'; उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक
Chitra Wagh: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed) पुन्हा निशाणा साधला आहे. 'हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.' असं म्हणतं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, 'व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटत नाही? व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार माजवला आहे. चार भिंतींच्या आत तुम्ही उघडे-नागडे नाचा, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकणी अशा पद्धतीनं कोणी वागले तर तुम्हाला त्याचा प्रसाद मिळेल. मी पुन्हा एकदा सांगितले, पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मी केली आहे. ज्या दिवशी मला ती सापडेल. तेव्हा पहिल्यांदा तिचं थोबाड रंगवेन आणि नंतर मी तुम्हाला ट्वीट करुन सांगेल की, मी काय केलं. हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.'
Rinku Rajguru: आर्चीनं शेअर केला 'बेशरम रंग' गाण्यावरील व्हिडीओ; नेटकरी कमेंट करत म्हणाले, 'एवढा पैसा आलाय तर...'
Rinku Rajguru: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असते. रिंकू ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ रिंकूनं शेअर केला आहे. या व्हिडीओमधील रिंकूच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी रिंकूनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे.
Ved : बॉक्स ऑफिसवर रितेश अन् जिनिलियाचा बोलबाला; 'वेड'ने तीन दिवसात जमवला 10 कोटींचा गल्ला
Ved Movie : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'वेड' सिनेमाचा समावेश झाला आहे.
Pathaan : शाहरुख खान 'पठाण'ची रिलीज डेट बदलणार?
KRK On Pathaan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता किंग खान या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Tunisha Sharma : तुनिषाच्या निधनानंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेचा सेट बदलला
Ali Baba Dastaan E Kabul : तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) या मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. तुनिषाने या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केल्याने सेटवर भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. पण शूटिंग थांबल्याने निर्मात्यांना मात्र मोठा फटका बसला होता. पण आता शो मस्ट गो ऑन म्हणत या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
Sumitra Sen : सुमित्रा सेन यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sumitra Sen Passes Away : ज्येष्ठ गायिका सुमित्रा सेन (Sumitra Sen) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची मुलगी श्रावणी बेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
Shiv Thakare : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेची सोशल मीडियावर हवा
Shiv Thakare : शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस' अर्थात 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) गाजवत आहे. अशातच शिवने आता नवा रेकॉर्ड केला आहे. इन्स्टाग्रामवर शिवने 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
View this post on Instagram
Ved Box Office Collection: रितेश-जिनिलियाच्या 'वेड' ला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Ved Day 4th Box Office Collection: मराठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं रणवीर सिंहच्या सर्कस या चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
View this post on Instagram