Entertainment News Live Updates 29 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Jui Gadkari On Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने अप्लावधितच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या लोकप्रिय मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेतील कलाकारांनी केक कापून या यशाचा आनंद सादरा केला आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरीनेदेखील (Jui Gadkari) खास पोस्ट शेअर केली आहे.
Movie Release April : एप्रिल (April) महिना सिनेप्रेक्षकांसाठी खूपच खास आहे. या महिन्यात अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. एप्रिलमध्ये रोमांच, थरार, नाट्य, अॅक्शन, देशभक्ती अशा वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यात सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi KI Jaan) या सिनेमासह समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) शाकुंतलम (Shaakuntalam) या सिनेमांचा समावेश आहे.
Movie Release April : सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' तर समंथाचा 'शाकुंतलम'; एप्रिल महिन्यात रिलीज होणार हे बिग बजेट चित्रपट
Nawazuddin Siddiqui Divorce : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजने त्याची पत्नी आलियावर तर आलियाने नवाजवर अनेक आरोप केले आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. नवाजने आलिया आणि त्याच्या भावावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता याप्रकरणी आलियाच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nawazuddin Siddiqui : घटस्फोट प्रकरणावर नवाजुद्दीन सेटलमेन्ट करणार? आलियाचे वकिल म्हणाले,"दोघांचं नातं टिकवण्यासाठी मी..."
Kangana Ranaut : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'लॉक अप' (Lock Upp) या लोकप्रिय कार्यक्रमाचं दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यामातून कंगनाने ओटीटी विश्वात पाऊल ठेवलं होतं. 'लॉक अप' च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाल्याने आता या कार्यक्रमाचं दुसरं पर्व (Lock Upp 2) छोट्या पडद्यावर प्रसारित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
Adipurush Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Vedat Marathe Veer Daudle Saat : महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) या बहुचर्चित सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पन्हाळा गडाच्या सज्जा कोठी परिसरात 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. दरम्यान सेटवरील घोड्यांची देखभाल करणारा तरुण तटबंदीवरुन कोसळला. गेल्या दहा दिवसांपासून तरुणावर कोल्हापुरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपाचारादरम्यान आज पहाटे (28 मार्च) त्याचा मृत्यू झाला आहे.
Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या स्टाईलनं आणि ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते. मलायकाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिचे जिम लूक्स आणि एअरपोर्ट लूक्स अनेकांचे लक्ष वेधतात. सध्या मलायका ही तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आहे.
Parineeti Chopra and Raghav Chadha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघे डिनरला एकत्र गेले. त्यावेळी फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. आता आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी एक ट्वीट शेअर करुन परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे परिणीती आणि राघव हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Avatar 2 OTT Release : प्रतीक्षा संपली; निळ्या विश्वाची जादू आता घरबसल्या पाहा; 'अवतार द वे ऑफ वॉटर' ओटीटीवर रिलीज
Avatar The Way Of Water OTT Release : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धमाका केला. गेल्या काही दिवसांपासून अवतारचे चाहते हा सिनेमा ओटीटीवर कधी रिलीज होणार याची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.
Ajay Devgn : करडी नजर, हातात सिगारेट...; अजय देवगनच्या 'मैदान'चं पोस्टर आऊट
Ajay Devgn Maidaan Poster Out : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगन (Ajay Devgn) सध्या चर्चेत आहे. त्याचा 'भोला' (Bholaa) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दरम्यान त्याने त्याच्या आगामी 'मैदान' (Maidaan) या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे.
June 2023 Release : शाहरुख खान ते प्रभास; जून महिन्यात रिलीज होणार सेलिब्रिटींचे चित्रपट
June 2023 Movies Release : हिंदी सिनेसृष्टीला (Bollywood) सध्या सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चांगले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. येत्या जून महिन्यातदेखील (June) अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सिनेप्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'पासून (Jawan) ते प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष'पर्यंत (Adipurush) अनेक बिग बजेट सिनेमे जून महिन्यात प्रदर्शित होणार आहेत.
'पठाण' (Pathaan) सिनेमानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आता 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 जून 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -