Entertainment News Live Updates 27 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jul 2022 05:00 PM
Disha-Tiger Breakup: दिशा आणि टायगरचं झालं ब्रेकअप? जॅकी श्रॉफ म्हणाला...

Disha-Tiger Breakup : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणारी  दिशा पटानी (Disha patani) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असतात. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किंवा कार्यक्रमांमध्ये दिशा आणि टायगरनं त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं. सध्या या दोघांचं ब्रेक-अप झालं आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोघे जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. दिशा आणि टायगरच्या ब्रेक-अपच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.   


वाचा सविस्तर बातमी 

Alia Bhatt On Twins : रणबीर कपूरनं जुळ्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्यावर आलियाची रिअॅक्शन; म्हणाली...

Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे.  काही दिवसांपूर्वी या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रणबीरनं दिलेल्या एका उत्तरामुळे त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. रणवीरच्या जुळ्या मुलांच्या वक्तव्यावर आता आलियानं प्रतिक्रिया दिली आहे.


वाचा सविस्तर बातमी 

Do Baaraa First Look : क्लासी आणि बॉसी.. ‘दो बारा’मधील तापसी पन्नूचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

Do Baaraa Taapsee Pannu First Look : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या ‘दो बारा’ (Do Baaraa) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच तिच्या या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी आणि दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप (Anurag kashyap) पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत दिसणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

गाणं अन् आनंदाचा सोहळा नेमका कशासाठी? ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत अनपेक्षित येणार मोठा ट्विस्ट!

Tu Tevha Tashi : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासून पसंती दर्शवली. या मालिकेतील अनामिका आणि सौरभची अव्यक्त प्रेमकथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अनामिका आणि पट्याच्या प्रेमकहाणी सोबत नील आणि राधाची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना पाहायला आवडतेय. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असतानाच, मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

IFFM : अभिषेक बच्चन आणि कपिल देव ऑस्ट्रेलियामध्ये फडकवणार तिरंगा; मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये लावणार हजेरी

IFFM : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) हे आता भारताचा झेंडा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये (IFFM) फडकवणार आहेत.  


वाचा सविस्तर बातमी 

Emergency चित्रपटात श्रेयस तळपदे साकारणार 'अटल बिहारी वाजपेयी' यांची भूमिका; अभिनेत्याचा फर्स्ट लूक रिलीज

Emergency : अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) इमर्जन्सी (Emergency) या  बहुचर्चित चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. तर काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेते  अनुपम खेर  (Anupam Kher) यांचा लूक रिलीज करण्यात आला होता. अनुपम हे या चित्रपटात जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. आता या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात तो अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारत आहे. 



Balwinder Safri : 'भांगडा स्टार' बलविंदर सफरी यांचे निधन; वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Balwinder Safri : 'भांगडा स्टार' अशी ओळख असणाऱ्या प्रसिद्ध पंजाबी गायक बलविंदर सफरी (Balwinder Safri)  यांचे निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून बरविंदर हे एका गंभीर आजाराचा सामना करत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर 86 दिवसांनी त्यांचे निधन झाले. 


वाचा संपूर्ण बातमी

Happy Birthday Rahul Bose : अभिनय क्षेत्रच नव्हे, तर खेळांमध्येही तरबेज असणारा बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता राहुल बोस!

Rahul Bose Birthday : अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) हा बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे, जो केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर सामाजिक कार्यातही खूप सक्रिय असतो. राहुल अनेकदा समाजसेवेत भाग घेत असतो. बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा अभिनेता अनेक खेळांमध्येही तरबेज आहे. राहुलचा जन्म 27 जुलै 1967 रोजी बंगळुरूमध्ये झाला. बॉलिवूड अभिनेता राहुल बोस आज त्याचा 55वा वाढदिवस साजरा करत आहे.


वाचा संपूर्ण बातमी

सोशल मीडियावर पोस्टद्वारे राकेश बापट-शमिता शेट्टीने केली ब्रेकअपची घोषणा!

Shamita Shetty-Raqesh Bapat: ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात अनेक जोड्या तयारही होतात आणि या घराबाहेर आल्यावर त्या दुरावतात. अशाच जोड्यांच्या यादीत आता आणखी एका जोडीचे नाव सामील झाले आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील लव्ह बर्ड्स अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) आणि अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आता आपण एकत्र नसल्याचे महटले आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना आपल्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. दोघांची जोडी तुटल्याने त्याच्या चाहत्यांना मात्र प्रचंड धक्का बसला आहे. दोघांचा एक म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी ब्रेकअप जाहीर केला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

दाक्षिणात्य चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी बॉलिवूडची ‘परम सुंदरी’

Kriti Sanon Birthday : बॉलिवूडची ‘परम सुंदरी’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आज (27 जुलै) आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रितीने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. तिने अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही क्रिती सेनन आजच्या काळात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती सेननने आज बॉलिवूडमध्ये स्वतःसाठी एक वेगळे आणि मोठे स्थान निर्माण केले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा झलकणार रुपेरी पडद्यावर


'तो, ती आणि फुजी' हा रोमॅंटिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठीतला प्रयोगशील दिग्दर्शक मोहित टाकळकर सांभाळणार आहे. भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले मुख्य भूमिकेत आहेत.


'बस बाई बस'च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत!


'बस बाई बस' या कार्यक्रमातून अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. 'बस बाई बस' हा कार्यक्रम 29 जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात काही सुप्रसिद्ध महिला व्यक्तिमत्व उपस्थित राहणार असून, सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सुबोध भावे प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करत असतो. आता सुबोध स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येणार आहे.


राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही शाबासकी : नचिकेत बर्वे


सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नचिकेत म्हणाला,"राष्ट्रीय पुरस्कार मला जाहीर होणं हे खूप आनंददायी आहे. आपण जे काम करतो ते आपण प्रामाणिकपणे करत असतो. तान्हाजी हा ऐतिहासिक सिनेमा होता. या सिनेमासाठी खूप अभ्यास करावा लागला. मेहनत घ्यावी लागली होती. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे शाबासकी मिळण्यासारखं आहे".


'एकदा काय झालं' सिनेमाचा ट्रेलर आऊट


'एकदा काय झालं' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची अतुरतेने वाट बघत होते. ट्रेलरवरून वडिल-मुलाच्या नाजूक नात्याला या कथेतून स्पर्श केलेला दिसतो. तसेच गोष्ट प्रभावीपणे सांगणाऱ्या माणसाच्या आयुष्याचीच गोष्ट या सिनेमातून साकारण्यात आल्याचेही ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे.


'कॉफी विथ करण'च्या मंचावर येणार विजय देवरकोंडा अन् अनन्या पांडे


सिने-निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सातवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या तीन भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता चौथ्या भागात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे दिसणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.