Entertainment News Live Updates 27 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 Dec 2022 06:39 PM
Viral Video: मुंबई पोलिसांसमोर तरुणानं गायलं केसरिया गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

Viral Videoसोशल मीडियावर (Social Media) कधी मजेशीर व्हिडीओ तर कधी समाजिक संदेश देणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या माध्यमातून नेटकरी विविध पोस्ट शेअर करुन लोकांचे मनोरंजन करत असतात. नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video). या व्हिडीओमध्ये एक तरुण हा मुंबईच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गाणं गाऊन दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 



Tunisha Sharma: तुनाषा शर्मा आत्महत्या प्रकरण: तुनिषाच्या अंत्यविधीसाठी शीझान खानची आई आणि तिची बहीण स्मशानभूमीत आल्या होत्या

Tunisha Sharma: तुनाषा शर्मा आत्महत्या प्रकरण: आत्महत्या केलेल्या तुनिषा शर्माच्या अंत्यविधीसाठी शीझान खानची आई आणि तिची बहीण स्मशानभूमीत आल्या होत्या.  दोघी बहिणी आणि आई स्मशानभूमीतून मोठ्याने रडत आणि उलट्या करत परतल्या.

Tunisha Sharma: तुनिषाला रुग्णालयात नेतानाचं सीसीटीव्ही फुटेज 'माझा' कडे

तुनिषा शर्माला (Tunisha Sharma) रुग्णालयात नेतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शिझान खान देखील दिसत आहे.


Lalit Prabhakar : ललित प्रभाकरचा टेरर अंदाज

Lalit Prabhakar Tarri : अभिनेता ललित प्रभाकरचा (Lalit Prabhakar) 'टर्री' (Tarri) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री... त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय...टर्री", असा जबरदस्त स्वॅग या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 





Tunisha Sharma : तुनिषा शर्माचे कुटुंबीय टेंबा रुग्णालयात पोहोचले

Tunisha Sharma : तुनिषा शर्माचे कुटुंबीय तिचा मृतदेह घेण्यासाठी टेंबा रुग्णालयात पोहोचले आहेत. काही वेळातच कुटुंबीय मृतदेह तिच्या निवासस्थानी घेऊन जातील.

Gandhi Godse Ek Yudh : दोन विचारधारांमधील युद्ध रुपेरी पद्यावर

Gandhi Godse Ek Yudh Chinmay Mandlekar : 'गांधी-गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका नक्की कोण साकरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे. 





salman khan: सलमान खानचा वाढदिवस; कतरिनानं दिल्या खास शुभेच्छा

Katrina Kaif: अभिनेत्री कतरिना कैफनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सलमान खानला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये तिनं सलमान खानचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'टायगर का हॅुप्पी बर्थ-डे '



Salman Khan: 'सलमान भाऊ...'; रितेश देशमुखची स्पेशल पोस्ट, भाईजानला दिल्या भरभरुन शुभेच्छा

Salman Khan: रितेशनं सलमानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला रितेशनं कॅप्शन दिलं, 'आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते, जी तुमच्या मागे खंबीरपणे उभी असते. आधाराची गरज आहे की नाही? हे तुम्हाला न विचारता ती व्यक्ती तुम्हाला कायम अधार देत असते. माझ्या आयुष्यात ती व्यक्ती सलमान भाऊ आहे. माझे त्याच्यावर किती प्रेम आहे? हे व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ...'



Sheezan Khan : पोलिसांसमोरच ढसाढसा रडू लागला शिझान

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) सध्या चर्चेत आहे. आता पोलीस चौकशी दरम्यान शिझानला रडू कोसळलं आहे. चौकशीदरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर शिझान रडू लागला.

Salman Khan: 'मुलं पाहिजेत पण त्यांची आई नको' सलमान खान असं का म्हणाला?

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमानची बहिण अर्पिता खाननं काल (26 डिसेंबर) खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान हा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सलमाननं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं होतं. 'मला मुलं पाहिजेत, पण त्यांची आई नको' असं त्या मुलाखतीमध्ये सलमाननं सांगितलं होतं. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tunisha Sharma : तुनिषाची काकू आज सकाळी परदेशातून तिच्या मीरा रोड येथील निवासस्थानी दाखल

Tunisha Sharma :  तुनिषाची काकू आज सकाळी परदेशातून तिच्या मीरा रोड येथील निवासस्थानी दाखल झाली आहे. मिरा भाईंदर येथील टेंबा (पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटल) येथे दुपारी 1 वाजता मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय येणार आहेत. मीरा रोड येथील स्मशानभूमीत दुपारी 3 वाजता कुटुंबीय तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार करणार आहेत.

Tejaswini Pandit : मला तू खूप आवडतोस...; तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत

Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा आगामी 'बांबू' (Bamboo) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीझर शेअर करत तेजस्विनीने एक हटके कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 





Salman Khan: वाढदिवस सलमानचा पण चर्चा एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची; व्हायरल फोटोमधील केमिस्ट्रीनं वेधलं अनेकांचं लक्ष

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खाानचा  (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमान खानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण काही सेलिब्रिटी सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजर झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सलमानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनला शहरुख खान, अभिनेत्री संगीता बिजलानी  (Sangeeta Bijlani) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. तसेच सलमान खानच्या कुटुंबातील काही सदस्य देखील बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सामील झाले. 


Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Tunisha Sharma Last Rites : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजता मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Raja Bapat : 'वादळवाट' फेम ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड

Raja Bapat Passed Away : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट (Raja Bapat) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.

Salman Khan Birthday : सलमान खानचा वाढदिवस; घराबाहेर एकही फॅन नाही!

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेल्या सलमान खानचा (Salman Khan) आज  57 वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहते गर्दी करत असतात. पण काल रात्री मात्र त्याच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळालेली नाही. 


Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार झाला 57 वर्षांचा; केक कट करत सलमानने चाहत्यांचे मानले आभार

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. आज भाईजान 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनत्याने वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील मंडळींसाठी त्याच्या बहिणीच्या घरी एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं. 



Salman Khan : Hum Aapke Hain Koun ते Bajrangi Bhaijaan; जाणून घ्या सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. आजवर त्याने एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे तो चर्चेत आला आहे. आज सलमानच्या वाढदिवशी जाणून घ्या त्याच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल...


Salman Khan : Hum Aapke Hain Koun ते Bajrangi Bhaijaan; जाणून घ्या सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे

Mirza Ghalib Birth Anniversary: गालिबच्या शायरीची जादू आजही कायम

Mirza Ghalib Birth Anniversary: मिर्झा असदुल्लाह बेग खान ज्यांना आपण सगळे मिर्झा 'गालिब' (Mirza Ghalib) या नावाने ओळखतो. त्यांच्या शायरीमुळे ते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. मिर्झा गालिब (Mirza Ghalib) यांनी जरी फारशी भाषेत शायरी लिहिण्यास सुरुवात केली असली, तरी ते पुढे उर्दू भाषेतील शायर म्हणून खूप प्रसिद्ध झाले. म्हणूनच गालिब (Mirza Ghalib) यांना उर्दू-फारसी भाषेतील सर्वकालीन महान शायर म्हटले जाते. गालिब यांनी शायरी आणि गझलला नवे रूप दिले. अनेकजण गालिब यांची गझल केवळ प्रेमाच्या संदर्भात पाहतात. मात्र त्यांनी आपल्या गझलेतून जीवनाचे तत्वज्ञान आणि रहस्य देखील मांडले आहे. आज त्यांची जयंती असून याच निमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ..


Mirza Ghalib Birth Anniversary: 'पूछते हैं वो कि 'ग़ालिब' कौन है, कोई बतलाओ कि हम बतलाएं क्या', गालिबच्या शायरीची जादू आजही कायम

Happy Birthday Salman Khan : वयाच्या सहाव्या वर्षी मुंबई गाठणारा Salman Khan आज आहे कोट्यवधींचा मालक!

Salman Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदौरमध्ये सलमानचा जन्म झाला. गेली 34 वर्ष वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 


Happy Birthday Salman Khan : कधी सिनेमासाठी खालल्या 30-35 चपात्या तर कधी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत; वयाच्या सहाव्या वर्षी मुंबई गाठणारा Salman Khan आज आहे कोट्यवधींचा मालक!

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Avatar 2 Box Office Collection : 'अवतार 2' लवकरच गाठणार 300 कोटींचा टप्पा


Avatar 2 Box Office Collection : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला असून या सिनेमाने बॉलिवूड, दाक्षिणात्य सिनेमांसह हॉलिवूडच्या सिनेमांना मागे टाकलं आहे. 16 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. दहा दिवसांत या सिनेमांने कोट्यवधींची कमाई केली आहे. 


Shah Rukh Khan : बॉडी बनवायला किती वेळ लागला? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखने दिलं मजेशीर उत्तर


Shah Rukh Khan Ask Me Anything On Twitter : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता शाहरुखने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.  रविवारी त्याने नाताळच्या निमित्ताने 'Ask Me Anything' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने मजेशीर उत्तरे दिली आहेत. 


Siddharth Jadhav : 'आपला सिद्धू' सुपरस्टार; रणवीर सिंहने केलं सिद्धार्थ जाधवचं कौतुक


Siddharth Jadhav : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav)आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांची मैत्री सर्वांवाच ठाऊक आहे. दोघेही नेहमी एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. मराठमोळा सिद्धु आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत 'सर्कस' (Circus) या सिनेमात झळकत आहे.  या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात रणवीरने आपल्या सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले. रणवीर सिंह म्हणाला,"सिद्धू सोबतचा माझा हा दुसरा सिनेमा असून, त्याच्यासारखा टेलेंटेड कलाकार मी आयुष्यात यापूर्वी क्वचितच पाहिला असेल. असं म्हणतात की, कलाकाराचा चांगुलपणा हा पडद्यावर झळकतोच, सिद्धूने आजवर जे प्रेम मिळवलय, याचे कारण म्हणजे तो माणूसच तसा आहे". रणवीर सिंह म्हणाला,"सिद्धू एक खूप चांगला, स्वच्छ मनाचा आणि प्रेमळ असा माणूस आहे. ज्याच्यासोबत काम करावसं वाटेल, सिद्धार्थ सुपरस्टार आहे." 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.