Tiger Nageswara Rao : रवी तेजाच्या 'टायगर नागेश्वर राव' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट; पाच भाषेतील पाच सुपरस्टार सिनेमात झळकणार
Tiger Nageswara Rao : रवी तेजाचा 'टायगर नागेश्वर राव' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tiger Nageswara Rao First Look Out : रवी तेजा (Ravi Teja) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा 'टायगर नागेश्वर राव' (Tiger Nageswara Rao) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. या अॅक्शनपटात गायत्री भारद्वाज (Gayathri Bharadwaj) आणि नुपूर सेननदेखील (Nupur Sanon) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आज निर्मात्यांनी 'टायगर नागेश्वर राव' या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट केला आहे.
'टायगर नागेश्वर राव'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला
'टायगर नागेश्वर राव' या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. वामसी के यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा टायगर नागेश्वर राव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1970 च्या काळातील गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
View this post on Instagram
तगडी स्टार कास्ट असलेला 'टायगर नागेश्वर राव'!
'टायगर नागेश्वर राव' या सिनेमात रवी तेजासह प्रवीण दाचारम, रेणु देसाई, मांडवा साई कुमार आणि राजीव कुमार अनेजा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रकाश कुमारने या सिनेमाला संगीत दिलं आहे. तर श्रीकांत विसाने या सिनेमाचे संवाद लिहिले आहेत. अविनाश कोल्लाने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
पाच भाषेतील पाच सुपरस्टार झळकणार 'टायगर नागेश्वर राव' सिनेमात
'टायगर नागेश्वर राव' (Tiger Nageswara Rao) या सिनेमात पाच भाषेतील पाच सुपरस्टार झळकणार आहेत. तेलुगू अभिनेता वेंकटेश, कन्नड अभिनेता शिवा राजकुमार, बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, तामिळ अभिनेता कार्थी आणि मल्याळम अभिनेता दुलकर सलमान या सिनेमात झळकणार आहेत. तर रवी तेजा या सिनेमात टायगर नागेश्वर रावच्या भूमिकेत दिसणार आहे.
'टायगर नागेश्वर राव' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टायगर नागेश्वर राव'च्या टीझरला बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आवाज दिला आहे. नुकतचं निर्माता अभिषेक अग्रवालने यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या