Entertainment News Live Updates 22 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jun 2022 07:18 PM
Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात दिसणार सारा अली खान आणि जान्हवी कपूर

Koffee With Karan 7 : सिने निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Kofee With Karan) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिसणार आहेत. 7 जुलैला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'डॉक्टर स्ट्रेंज 2' डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज

मार्वल स्टुडिओचा बहुचर्चित 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा (Doctor Strange In The Multiverse of Madness) दुसरा भाग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 6 मे रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता.





अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पण आता केतकीला जामीन मंजूर झाला आहे. 

'भूल भुलैया 2' अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा रेकॉर्ड मोडणार? लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 183.24 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे. 

Man Udu Udu Zhala : इंद्रा-दीपू पुन्हा संकटात

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. इंद्राच्या कामाचे सत्य अखेर देशपांडे सर आणि इंद्राच्या आईसमोर आले आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. देशपांडे सरांनी इंद्रा-दीपूचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


Man Udu Udu Zhala : इंद्रा-दीपू पुन्हा संकटात; माझ्या मुलीचा हात गुंडाच्या हातात देणार नाही : देशपांडे सर

सिद्धार्थ जाधवचा घटस्फोट? पत्नीनं हटवलं सोशल मीडियावरुन 'जाधव' आडनाव

Siddharth Jadhav : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी निभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे अडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा तृप्ती आणि त्याच्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. 


वाचा सविस्तर बातमी 

शमशेराचा टीझर रिलीज

बुरखा परिधान करुन डान्स केल्यानं मंदाना करीमी ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Mandana Karimi : प्रसिद्ध अभिनेत्री मंदाना करीमी (Mandana Karimi) तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. मंदानाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. मंदाननं एकता कपूर (Ekta Kapoor) आणि कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्या लॉकअप (Lock Upp) शोमध्ये सहभाग घेतला होता. सध्या मंदाना तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये मंदाना ही बुरखा परिधान करुन डान्स करताना दिसत आहे. ज्यामुळे मंदानाला अनेकांनी ट्रोल केलं. या ट्रोलर्सला मंदानानं सडेतोड उत्तर दिलं आहे. '


वाचा सविस्तर बातमी 

Suhana Khan : सुहाना खानला फोटोग्राफर्स म्हणाले, 'हमारा चेहरा याद रखना'

पाहा व्हिडीओ:





'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीनं शेअर केला खास व्हिडीओ

पाहा व्हिडीओ:





Pushpa 2: पुष्पा-2 मध्ये होणार श्रीवल्लीचा मृत्यू? पाहा काय म्हणाले चित्रपटाचे निर्माते

डिसोंबर 2021 रोजी रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील गाण्यांना तसेच डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदनानं (Rashmika Mandana) प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहे. रश्मिकानं या चित्रपटामध्ये श्रीवल्ली ही भूमिका साकारली. पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागातमध्ये  श्रीवल्ली (Srivalli) या भूमिकेचा मृत्यू होणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाचे निर्माते वाय रवी शंकर  (Y Ravi Shankar) यांनी पुष्पा-2 च्या कथानकाबाबत सांगितलं. 


वाचा सविस्तर बातमी 

Aamir Khan : पावसात आमिर आणि आझाद खेळत होते फुटबॉल; व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ:





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


‘शाबास मिथू’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज


बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सध्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता लवकरच तिचा  'शाबास मिथू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तापसीनं 'शाबास मिथू' चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.


कधी काळी बॅकग्राउंड डान्सर म्हणून केलं काम, आता साऊथसह बॉलिवूड गाजवतेय काजल अग्रवाल!



Kajal Aggarwal Birthday : साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आज (19 जून) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपटातून केली होती. मात्र, साऊथ इंडस्ट्रीने तिला खरी ओळख मिळवून दिली. साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर  अभिनेत्री काजळ अग्रवालने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि बॉलिवूडविश्वही गाजवले.


काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीने मास मीडिया विषयामध्ये पदवी मिळवली आहे. काजलला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती.


'शमशेरा' सिनेमातील रणबीर कपूरचा लूक आऊट


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'शमशेरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात संजय दत्त आणि वाणी कपूरदेखील दिसणार आहे. नुकताच 'शमशेरा' सिनेमातील रणबीरचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आलिया भट्टनेदेखील सोशल मीडियावर रणबीरचा लूक शेअर केला आहे.


 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.