Entertainment News Live Updates 21 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Suchandra Dasgupta Death : बंगाली मालिकांमध्ये काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं (Suchandra Dasgupta) निधन झालं आहे. रस्ते अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं आहे. सुचंद्राच्या निधनाने बंगाली मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
Suchandra Dasgupta : बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं रस्ते अपघातात निधन; ड्रायव्हरला अटक
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
Marathi Serial : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत अव्वल; 'आई कुठे काय करते' दुसऱ्या क्रमांकावर
Aaliyah Kashyap Gets Engaged To Shane Gregoire : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक (Anurag Kashyap) आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सध्या चर्चेत आहे. आलियाने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. बॉयफ्रेंडसोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर करत तिने यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.
Ghum Hai Kisikey Pyaar Meiin Serial Latest Update : 'गुम है किसी के प्यार मैं' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पण आता मालिकेतील मुख्य कलाकार मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. नील भट्ट, आयशा शर्मा आणि हर्षद अरोडा आता 'गुम है किसी के प्यार मैं' मालिकेतून एक्झिट घेणार आहेत.
Ghum Hai Kisikey Pyaar Meiin : नील भट्टसह आयशा आणि हर्षद सोडणार 'गुम है किसी के प्यार मैं' मालिका; समोर आलं मोठं कारण
Ghum Hai Kisikey Pyaar Meiin Serial Latest Update : 'गुम है किसी के प्यार मैं' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पण आता मालिकेतील मुख्य कलाकार मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. नील भट्ट, आयशा शर्मा आणि हर्षद अरोडा आता 'गुम है किसी के प्यार मैं' मालिकेतून एक्झिट घेणार आहेत.
Bharat Jadhav : मराठी सिनेमांचा सुपरस्टार, दिलखुलास अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) सध्या 'तू तू मी मी' या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करत आहे. नुकताच या नाटकाचा रत्नागिरीत (Ratnagiri) प्रयोग पार पडला असून या प्रयोगादरम्यान भरत जाधवला भीषण अनुभव आला आहे. या प्रयोगानंतर रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही, असं म्हणत भरत जाधवने संपात व्यक्त केला आहे.
Sundara Manamadhe Bharli Marathi Serial Latest Update : 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. दिवसेंदिवस या मालिकेची क्रेझ वाढत चालली असून या मालिकेत आता मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या आजच्या भागात देवा लतिकाला प्रपोज करताना दिसणार आहे.
Siddarth Jadhav Video Viral : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या कार्यक्रमातील एका भागाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) 'अप्सरा आली' गाण्यावर कविता ऐकवताना दिसत आहे.
City Of Dreams Season 3 Promo Out : 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या (City Of Dreams 3) तिसऱ्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. लवकरच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या सीरिजच्या नव्या प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोतील डॉयलॉग प्रेक्षकांना थक्क करणारा आहे.
Salman Khan New Photo : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. दोन दिवसांपूर्वी त्याने 'टायगर 3'च्या (Tiger 3) शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. अशातच आता भाईजानने आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्याचा नवा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Don 3 : 'डॉन 3'मध्ये शाहरुख खानची जागा घेणार Ranveer Singh
Ranveer Singh In Don 3 : फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'डॉन 3' (Don 3) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली. या सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत असणार असे म्हटले जात होते. पण नंतर आता शाहरुखने या सिनेमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली. आता या सिनेमातील शाहरुख खानची जागा रणवीर सिंह (Ranveer Singh) घेणार असल्याचं समोर आलं आहे.
Adipurush: आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस
Adipurush: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यानंतर चित्रपटाच्या टीझरमधील VFX आणि अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) लूक या गोष्टींवर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला. त्यानंतर अनेकांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. आता आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटामधील जय श्री राम (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
सलमान खान मुंबईत बांधणार 19 मजली हॉटेल!
Salaman Khan : बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक कलाकार दररोज कुठे ना कुठे गुंतवणूक करतात किंवा एखादी गोष्ट खरेदी करतात. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील (Salman Khan) यात आघाडीवर आहे. सलमान आता मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर 19 मजली हॉटेल बांधणार आहे. भाईजानच्या या 19 मजली हॉटेलबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान कार्टर रोडवरील सी-फेसिंग प्लॉटवर हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे. बीएमसीने त्याच्या या हॉटेलच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सलमानचं हे 19 मजली हॉटेल असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -