Bharat Jadhav : "रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही"; भरत जाधवने हात जोडत प्रेक्षकांची मागितली माफी
Bharat Jadhav : रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव नाराज झाला आहे.
Bharat Jadhav : मराठी सिनेमांचा सुपरस्टार, दिलखुलास अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) सध्या 'तू तू मी मी' या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करत आहे. नुकताच या नाटकाचा रत्नागिरीत (Ratnagiri) प्रयोग पार पडला असून या प्रयोगादरम्यान भरत जाधवला भीषण अनुभव आला आहे. या प्रयोगानंतर रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही, असं म्हणत भरत जाधवने संपात व्यक्त केला आहे.
भरत जाधव यांच्या 'तू तू मी मी' या नाटाकाचा रत्नागिरीत प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगादरम्यान एसी आणि साऊंड सिस्टीम नसल्यामुळे भरत जाधव नाराज झाला आहे. भरत जाधवचा रत्नागिरीतील प्रयोगादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही : भरत जाधव
रत्नागिरीच्या प्रयोगादरम्यानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये भरत जाधव म्हणत आहे की,"एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भूमिकेतून पाहा. तुम्ही प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता?" त्यानंतर प्रेक्षकांची माफी मागत हात जोडत ते म्हणाले की,"मी पुन्हा रत्नागिरीत प्रयोग करणार नाही".
भरत जाधवआधी अनेक कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगादरम्यान होत असलेल्या त्रासाबद्दल आणि नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर भाष्य केलं आहे. नुकतचं अभिनेता वैभव मांगलेनेदेखील नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल खास पोस्ट लिहिली होती. त्याने लिहिलं होतं,"नाशिकच्या नाट्यगृहातील एकाही ठिकाणाची वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात प्रयोग पाहत होते".
नाट्यगृहाच्या दुसरावस्थेबाबत अनेक कलाकार आवाज उठवत आहेत. पण आजवर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. आता मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यागोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी रंगकर्मींना आणि नाट्यरसिकांना आशा आहे.
शनिवारी रत्नागिरीच्या नाट्यगृहात 'तू तू मी मी' या नाटकाचा रात्री 10 वाजता प्रयोग होता. प्रचंड उकाड्यात हा प्रयोग सुरू झाला. दरम्यान नाट्यगृहातील एसी बंद होता. तसेच फॅनदेखील नव्हते. नाट्यगृहाची स्वतःची साऊंड सिस्टिम नसल्याने कलाकारांना त्रास सहन करावा लागला आहे. तसेच प्रेक्षकांना देखील प्रचंड उकाड्यात हे नाटक पाहावं लागलं. भरत जाधव यांनी याआधीदेखील ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील भोंगळ कारभार आणि दुरावस्थेबद्दल संपात व्यक्त केला होता.
संबंधित बातम्या