Entertainment News Live Updates 20 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या दहा क्रमांकावर आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार एममेकांसाठी खास पोस्ट लिहित आहे. अशातच मालिकेतील कार्तिकने म्हणजेच ऋतुराज फडकेने (Ruturaj Phadake) पौर्णिमा तळवलकरसाठी (Purnima Talwalkar) एक खास पोस्ट लिहिली आहे.
'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळत असते. 2016 मध्ये कॉमेडी किंग कपिल शर्माचा (Kapil Sharma) 'द कपिल शर्मा शो'ला सुरुवात झाली होती. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
Sangeet Devbabhali : भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या (Bhadrakali Production) संगीत देवबाभळी (Sangeet Devbabhali) या मराठी रंगभूमीवरील नाटकाचा या वर्षीपासून मुंबई विद्यापीठीच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या मराठी विषयात समावेश करण्यात आला आहे. या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्राजक्त देशमुखने (Prajakt Deshmukh) सांभाळली आहे. या नाटकाचा बी ए अभ्यासक्रमात समावेश होणं ही मराठी नाट्यसृष्टीसाठी आनंदाची बाब आहे.
Liger Trailer Launch : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याला ‘लायगर’ (Liger) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गुरुवारी (21 जुलै) संध्याकाळी लायगर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला चित्रपटाच्या टीमसोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता उपस्थित राहणार आहे.
Prerna Arora : बॉलिवूडमधील चित्रपट निर्माती प्रेरणा अरोराच्या (Prerna Arora) विरोधात ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेरणा अरोरा विरोधात ईडीने 31 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने प्रेरणा अरोराला आज हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते पण ती हजर झाली नाही, तिच्या वतीने तिचे वकील ईडी ऑफिसमध्ये पोहोचले आणि त्यांनी ईडीकडे वेळ मागितला. वकील विवेक वासवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा मुंबईतून कामानिमित्त बाहेर आहे त्यामुळे हजर राहू शकले नाही.
Justin Beiber India Tour : प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर (Justin Bieber) यानं काही दिवसांपूर्वी त्याला झालेल्या ‘रामसे हंट सिंड्रोम’(Ramsay Hunt Syndrome) या आजारची माहिती चाहत्यांना दिली होती. या आजारामुळे जस्टिनला त्याचे अनेक शो रद्द करावे लागले. आता त्याच्या 'जस्टिस वर्ल्ड टूर' ला (Justice World Tour) पुन्हा सुरुवात होणार आहे. या टूरमध्ये इंडिया टूरचा देखील समावेश होणार आहे. जाणून घेऊयात जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टच्या तिकीटाबाबात....
Indian Idol : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल (Indian Idol) हा भारतीय टेलिव्हिजनवरील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय गायन रियालिटी शो आहे. या कार्यक्रमाने अनेक होतकरू गायकांना राष्ट्रीय मंचावर गाण्याची संधी देऊन त्यांची स्वप्नं पूर्ण केली आहेत. 2004 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमानं देशाला सलमान अली (सत्र 10 चा विजेता), सनी हिंदुस्तानी (सत्र 11 चा विजेता) आणि अगदी अलीकडे पवनदीप राजन (सत्र 12 चा विजेता) यांसारखे अद्भुत आवाज दिले आहेत, ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना वेड लावलं. इंडियन आयडॉलचे ऑडिशन्स विविध शहरांमध्ये दिसू लागला आहे. यंदाच्या सिझनचे मुंबईतील ऑडिशन 24 जुलै रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृत शक्ती कॉम्प्लेक्स, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400072 येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत.
File Number 498 A : "तुझ्यात जीव रंगला" (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. 'फाईल नंबर - 498 अ" (File Number 498 A) या चित्रपटात हे दोघं महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या प्रसिद्ध कार्यक्रामाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक प्रेक्षक हा कार्यक्रम आवडीनं बघतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग मोठा आहे. कार्यक्रमातील कलाकार सेटवरील मज्जा, मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच अभिनेता प्रसाद खांडेकरनं (Prasad Khandekar) एका खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन प्रसादनं खास पद्धतीनं अभिनेत्री वनिता खरातला (vanita kharat) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पाहा व्हिडीओ:
Brahmastra Kesariya Song : प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील केसरिया (Kesariya) हे गाणं 17 जुलै रोजी रिलीज झालं. या गाण्याला काही लोकांची पसंती मिळाली तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं. मजेशीर मीम्स सोशल मीडियावर शेअर करुन काही नेटकऱ्यांनी या गाण्याला ट्रोल केलं आहे. आता या ट्रोलर्सला चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) आणि रणबीरनं उत्तर दिलं आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Ranbir Alia : रणबीर-आलियाकडे एक नव्हे, दोन चिमुकले पाहुणे येणार? अभिनेत्याच्या उत्तराने वेधलं चाहत्यांचं लक्ष!
सध्या सगळीकडेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे. नुकतीच या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मात्र आता रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रणबीरने दिलेल्या एका उत्तरामुळे आता त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधू लागले आहेत.
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत विशाखा सुभेदारची एन्ट्री होणार! अप्पू-शशांक आता तरी एकत्र येणार?
स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कानेटकर फॅमिली अपूर्वा आणि शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ‘दमयंती दुधखुळे’ असं या पात्राचं नाव असून, ती एक विवाह सल्लागार असणार आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार दमयंती दुधखुळे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Naseeruddin Shah Birthday : नसीरुद्दीन शाह यांची 'फिल्मी' लव्ह स्टोरी; रत्ना पाठक यांच्या आधी कोणाला करत होते डेट?
Naseeruddin Shah : पार (Paar),मंडी (Mandi),अ वेडनेसडे (A wednesday), द डर्टी पिक्टर (The Dirty Picture)यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे अभिनेता नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah)यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. नसीरूद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी झाला. नसीरूद्दीन शाह यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. नसीरूद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -