Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आपल्या बेधडक फलंदाजीने अवघ्या जगाला धडकी भरवलेला भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती (Aarti Ahlawat And Virendra Sehwag) घटस्फोटाच्या बातम्यांमुळे पुन्हा एकदा क्रिकेटपटूचा संसार मोडत असल्याची चर्चा आहे. लग्नाला दोन दशके झाली असल्याने अचानक अशी घटस्फोटाची बातमी येत असल्याने सोशल मीडियातही आश्चर्यचिकत करणाऱ्या प्रतिक्रिया येत असून ही फक्त अफवा राहूदे अशीही प्रार्थना करत आहेत. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत आणि त्यांचे 21 वर्षांचे नाते तुटणार आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या दाव्यांदरम्यान, सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली आहे. जेव्हा आरती सेहवागचा 6 वर्षांपूर्वी विश्वासघात झाला होता. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांची मदत घ्यावी लागली.
काय होते संपूर्ण प्रकरण?
6 वर्षांपूर्वी 2019 मध्ये आरती सेहवागचा तिच्या व्यावसायिक भागीदारांकडून विश्वासघात झाला होता. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले होते. नाव आणि स्वाक्षरीचा गैरवापर करून सुमारे साडेचार कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप तिने केला होता. आरतीच्या म्हणण्यानुसार, तिने व्यवसायासाठी दिल्लीतील अशोक विहारमध्ये रोहित कक्कर नावाच्या व्यक्तीशी भागीदारी केली होती, पण रोहित आणि त्याच्या काही जवळच्या लोकांनी गैरफायदा घेतला होता.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार
सेहवागच्या पत्नीच्या माहितीशिवाय, आरती आणि वीरेंद्र सेहवागचे संबंध असल्याचे आणखी एका बिल्डर फर्मकडून सांगण्यात आले. यानंतर फसवणूक करून त्यांच्या स्वाक्षरीने कर्ज घेतले आणि नंतर त्याची परतफेड करणे बंद केले. आरतीच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये आधीच करार झाला होता की त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही काम केले जाणार नाही. आरतीला हा प्रकार कळताच तिने तत्काळ कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.
घटस्फोटाबाबत रंगली चर्चा
वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचा विवाह 2004 साली झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता, ज्याबद्दल दोघांचेही कुटुंब आनंदी नव्हते. मात्र, कसेबसे त्याने घरच्यांना पटवले. मात्र आता 21 वर्षांनंतर त्यांचे नाते तुटताना दिसत आहे. दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या बातम्यांना आणखी बळ मिळत आहे. सेहवाग आणि त्याची पत्नी दीर्घकाळापासून एकमेकांपासून दूर राहत असल्याचा दावाही केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या