Entertainment News Live Updates 19 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 19 May 2023 03:15 PM
Cannes 2023: आधी मगरीचा नेकलेस आणि आता निळी लिपस्टिक; उर्वशी रौतेलाचा कान्स लूक चर्चेत

Urvashi Rautela Cannes Lookकान्स फिल्म फेस्टिव्हलला 16 मे रोजी सुरुवात झाली आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes 2023) रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा पहायला मिळत आहे. यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela) देखील हजेरी लावली होती. यावेळी तिनं केलेल्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. उर्वशी रौतेलानं परिधान केलेल्या मगरीच्या डिझाइनच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर, आता तिनं ओठांवर निळी लिपस्टिक देखील लावली आहे. त्यामुळे अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. 



Vaalvi Marathi Movie : सिनेमागृहात धुमाकूळ घातलेला 'वाळवी' आता घरबसल्या पाहा

Vaalvi Marathi Movie World Television Premiere : 'वाळवी' (Vaalvi) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर हा सिनेमा आता प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे.

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर यांनी लावली हजेरी; पाहा प्रोमो

The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात.'द कपिल शर्मा शो' च्या  एका एपिसोडमध्ये अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini), संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) आणि वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी हजेरी लावली आहे. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये मंदाकिनी, संगीता बिजलानी आणि वर्षा उसगावकर  यांना कपिल हा मजेशीर किस्से सांगताना दिसत आहे. 



Manushi Chhillar : 'कान्स 2023'मधील मानुषी छिल्लरच्या लूकने वेधलं लक्ष; विश्व सुंदरीचा व्हाइट गाऊन बनवायला लागले तब्बल 800 तास

Cannes Film Festival 2023 Manushi Chhillar Look : बहुप्रतिक्षित 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' (Cannes Film Festival 2023) सध्या पार पडत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय अभिनेत्रीदेखील आपल्या फॅशनने कॉन्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत आहेत. विश्व सुंदरी मानुषी छिल्लरदेखील (Manushi Chhillar) 'कान्स 2023'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसून आली आहे. तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


वाचा सविस्तर





Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाचा स्वराज विषयीचा राग हजारो लोकांसमोर आला; 'तुझेच मी गीत गात आहे’ च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील स्वराजच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  सध्या स्वराजचा आवाज परत आल्यानं मल्हार आनंदी झाला आहे, असं या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं आहे. आता मल्हारनं सोशल मीडियावर एक लाईव्ह केलं आहे. या लाईव्हमध्ये तो लोकांना स्वराजबद्दल सांगताना दिसत आहे. 



Ashok Saraf : अशोक सराफ यांना मामा नाव कसं पडलं? स्वत:चं सांगितला किस्सा

Khupte Tithe Gupte Ashok Saraf : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) लोकप्रिय 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या आगामी भागात अशोक सराफ (Ashok Saraf) हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ त्यांना मामा नाव कसं पडलं हे सांगताना दिसत आहेत. 



Afwaah Movie Review : आयुष्याची उलथापालथ करणारी 'अफवा'

Afwaah : एखाद्या गोष्टीची अफवा ही वणव्यासारखी पसरते, असं म्हटलं जातं. जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञानाचा अवलंब करत वेगाने अफवा पसरवली जात आहे. तुम्हीदेखील सोशल मीडियावर काहीही विचार न करता एखादा व्हिडीओ फॉरवर्ड किंवा शेअर करत असाल तर 'अफवाह' (Afwaah) हा सिनेमा नक्की पाहा...  अफवा पसरवण्याची एक चूक किती महागात पडते हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.


वाचा सविस्तर

Milind Gawali : "खूप लोकांना असं वाटतं की..."; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्धच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील कथानकासह कलाकारांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी सोशल मीडियावर वेळेचं महत्त्व सांगणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 


वाचा सविस्तर



Salman Khan : सलमान खानला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत

Salman Khan Injured : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमामुळे चर्चेत होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. चाहत्यांना आता त्याच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची प्रतीक्षा आहे. भाईजान सध्या 'टायगर 3' या सिनेमाचं शूटिंग करत असून या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.


वाचा सविस्तर





Disha Parmar Rahul Vaidya : कुणीतरी येणार येणार गं! दिशा परमार-राहुल वैद्यने दिली गुडन्यूज! सोशल मीडियावर शेअर केला थेट सोनोग्राफी रुममधला व्हिडीओ

Disha Parmar Rahul Vaidya Good News : लोकप्रिय गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) 2021 साली लग्नबंधनात अडकले. आता दिशा आणि राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याने चाहत्यांना आता गुडन्यूज दिली आहे. 


Disha Parmar Rahul Vaidya : कुणीतरी येणार येणार गं! दिशा परमार-राहुल वैद्यने दिली गुडन्यूज! सोशल मीडियावर शेअर केला थेट सोनोग्राफी रुममधला व्हिडीओ





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


शुभमन गिल म्हणतो....विराट कोहली वेनम तर ईशान किशन स्पायडरमॅन


Shubman Gill : विराट कोहलीला वेनमच्या तर ईशान किशन याला स्पायडरमॅनच्या भूमिकेत पाहायला आवडेल, असे शुभमन गिल याने सांगितले. मुंबईत स्पायडरमॅन चित्रपाटचा ट्रेलर लाँच केला, त्यावेळी तो बोलत होता. शुभमन गिल याने आज अॅनिमेशन फिल्म 'स्पायडरमॅन : एक्रॉस द स्पायडर-वर्स' याच्या हिंदी आणि पंजाबी ट्रेलरला मुंबईमध्ये लाँट केलेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात भारतीय स्पायडरमॅनमध्ये असणारे कॅरेक्टर 'पवित्र प्रभाकरन' याला शुभमन गिल याने आवाज दिलाय. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाला शुभमन गिल याने आवाज दिलाय. चित्रपटाच्या डबिंग आणि ट्रेलर लाँचिंगवेळी गिल उत्साहात दिसत होता.  एक जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. देशभरातील 1800 स्क्रीनवर चित्रपट रिलीज होणार आहे. भारतात हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषेत चित्रपट रिलिज होणार आहे.


The Kerala Story: सुप्रीम कोर्टाने 'द केरळ स्टोरी' वर पश्चिम बंगाल सरकारने घातलेली बंदी उठवली


The Kerala Story:  पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'  (The Kerala Story) चित्रपटावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने 'द केरळ स्टोरी' चित्रपट वर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने घातलेली बंदी उठवली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात एक डिस्क्लेमर टाकायला सांगितले आहे. ज्यामध्ये, "32000 मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण झाल्याचा कुठलाही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. एका विषयाचे हे काल्पनिक रूप आहे. " असं लिहिलेलं असावं.


IPL 2023 : शुभमन गिल झाला स्पायडर मॅन


CRICKETER SHUBMAN GILL LAUNCHES ‘SPIDER-MAN’ HINDI & PUNJABI TRAILERS : शुभमन गिल सध्या आयपीएलमध्ये वादळी फलंदाजी करत आहे. शुभमन गिल फलंदाजीमुळे चर्चेत आहेच.. पण आज तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. शुभमन गिल याने अॅनिमेशन चित्रपट स्पायडरमॅन एक्रॉस द स्पायडर वर्स या चित्रपटात आपला आवाज दिलाय.. शुभमन गिल याने स्पायडरमॅनच्या अॅनिमेशनला आपला आवाज दिलाय.


शुभमन गिल याने आज अॅनिमेशन फिल्म 'स्पायडरमॅन : अॅक्रॉस द स्पायडर-वर्स' याच्या हिंदी आणि पंजाबी ट्रेलरला मुंबईमध्ये लाँट केलेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात भारतीय स्पायडरमॅनमध्ये असणारे कॅरेक्टर 'पवित्र प्रभाकरन' याला शुभमन गिल याने आवाज दिलाय. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाला शुभमन गिल याने आवाज दिलाय. चित्रपटाच्या डबिंग आणि ट्रेलर लाँचिंगवेळी गिल उत्साहात दिसत होता.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.