Salman Khan : सलमान खानला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; फोटो शेअर करत म्हणाला,"टायगर जखमी आहे"
Tiger 3 : 'टायगर 3'च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत झाली आहे. भाईजानने एक ट्वीट करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
Salman Khan Injured : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमामुळे चर्चेत होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. चाहत्यांना आता त्याच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची प्रतीक्षा आहे. भाईजान सध्या 'टायगर 3' या सिनेमाचं शूटिंग करत असून या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
'टायगर 3'च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत (Salman Khan Shared Post)
सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गंभीर दुखापतीबाबत माहिती दिली आहे. 'टायगर 3'च्या सेटर भाईजानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने सोशल मीडियावर पाठमोरा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या फोटोमध्ये त्याच्या पाठीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. सलमानला नेमकी कशामुळे दुखापत झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सलमानने पाठमोरा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"जेव्हा तुम्हाला वाटतं की संपूर्ण जगाचा भार तुमच्या खांद्यावर आहे त्यावेळी जगाला सोडा आणि पाच किलोच्या डंबलचे वजन उचलून दाखवा... टायगर जखमी आहे". सलमानचा हा फोटो पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तसेच त्याची जखम लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. सलमानच्या या फोटोवर काळजी घे, प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, जखमी टायगरपेक्षा खतरनाक कोणी असू शकत नाही', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
सलमानचा 'टायगर 3' कधी प्रदर्शित होणार? (Salman Khan Tiger 3 Release Date)
सलमानच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमात तो बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कॅफ (Katrina Kaif) आणि इमरान हाशमीसोबत झळकणार आहे. त्याचा हा सिनेमा येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकताच ईदच्या मुहूर्तावर त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली.
'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या सिनेमांप्राणे 'टायगर 3'ला प्रेक्षकांची पसंती मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'एक था टायगर' हा सिनेमा 2012 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' प्रदर्शित झाला. आता 11 वर्षांनंतर या सिनेमाचा तिसरा भाग अर्थात 'टायगर 3' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
संबंधित बातम्या