Entertainment News Live Updates 18 February : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण अन् प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट; 'प्रोजेक्ट के'ची रिलीज डेट जाहीर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Famous Marathi Movie : ॲक्शनचा तडका असलेला 'फेमस' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
Famous Marathi Movie Poster : 'गवसाने प्रॉडक्शन हाऊस' आणि 'गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस' प्रस्तुत तसेच 'ए. जी प्रोडक्शन हाऊस' यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्दर्शक अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित 'फेमस' हा नवीन ऍक्शन आणि रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘रावरंभा’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अभिनेता शंतनू मोघे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
Ravrambha: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या चित्रपटांतून मांडले गेले. त्यासाठी मराठीतील अनेक गुणी कलावंतांनी शिवरायांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली. आता आगामी ‘रावरंभा’ (Ravrambha) या मराठी चित्रपटातून शंतनू मोघे (Shantanu Moghe) हा गुणी अभिनेता छत्रपतींच्या व्यक्तिरेखेतून आपल्या समोर येत आहे. ‘रावरंभा’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टरप्रदर्शित झाले आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.
Lock Upp Season 2 : 'बिग बॉस-16 फेम अर्चना गौतम कंगनाच्या जेलमध्ये कैद होणार?
Lock Upp Season 2 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) ठरला. पण, इतर स्पर्धकांची लोकप्रियता पण काही कमी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या (Salman Khan) शो नंतर आता बिग बॉसची स्पर्धक अर्चना गौतमला एकता कपूरच्या 'लॉक अप 2' शोची ऑफर आली आहे.
माजलगावच्या अनिलकुमार साळवे यांनी न्यू जर्सी येथील फिल्म फेस्टिवलमध्ये पटकावला पुरस्कार
Global Adgaon Movie: बीडमधील (Beed) माजलगावच्या (Majalgaon) अनिलकुमार साळवे (Anilkumar Salve) यांनी दिग्दर्शित केलेला ग्लोबल आडगाव (Global Adgaon) या चित्रपटानं अमेरिकेतील न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये (New Jersey Film Festival) पुरस्कार पटकावला आहे. अनिलकुमार साळवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून 672 कलाकारांचा हा भव्यदिव्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Project K : महाशिवरात्रीनिमित्त दीपिका पादुकोण अन् प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट; 'प्रोजेक्ट के'ची रिलीज डेट जाहीर!
Project K Release Date Out : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) गेल्या काही दिवसांपासून 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता महाशिवरात्रीनिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.
View this post on Instagram
Amitabh Bachchan ते Kangana Ranaut; बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
Bollywood Stars Give Their Fans Mahashivratri 2023 Wishes : आज देशभरात महाशिवरात्री (Mahashivratri) जल्लोषात साजरी केली जात आहे. विविध ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ते पंगाक्वीन कंगना रनौतपर्यंत (Kangana Ranaut) अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Akshay Kumar : अक्षय कुमारच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला; रुग्णालयात दाखल
Akshay Kumar Makeup Artist Attacked By Leopard : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी 'बडे मियॉं छोटे मियॉं' (Bade Miyan Chote Miyan) या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता या सिनेमाच्या सेटवर खिलाडी कुमारचा मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मावर एका बिबट्याने हल्ला केला आहे.
#Leopard #ATTACK'in film City road in #Mumbai ...
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) February 17, 2023
Leopard attack Shravan Vishwakarma,who works as a make-up artist in the film industry.#forest@MumbaiPolice pic.twitter.com/2bKCckPGJP
The Night Manager Review : भव्यता, रोमांच आणि नाट्यमय संघर्ष मांडणारी 'द नाईट मॅनेजर'
The Night Manager Web Series Review : अनिल कपूर (Anil Kapoor) आणि आदित्य रॉय कपूरची (Aditya Roy Kapur) 'द नाईट मॅनेजर' (The Night Manager) ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. ब्रिटीश वेब सीरिजचं भारतीय रुपांतर करण्यात आलेली ही वेबसीरिज अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दोन भागांमध्ये ही सीरिज प्रदर्शित करण्यात येणार आहे. आतापर्यंत या वेब सीरिजचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून उर्वरित भाग जूनमध्ये प्रदर्शित करण्यात येतील.
The Night Manager Review : भव्यता, रोमांच आणि नाट्यमय संघर्ष मांडणारी 'द नाईट मॅनेजर'
उद्या रंगणार "देवमाणूस" माणूस होण्याची गोष्ट.... या नाटकाचा 25वा प्रयोग
26 डिसेंबर 2022 रोजी मराठी रंगभूमीवर "देवमाणूस" माणूस होण्याची गोष्ट' हे नाटक दाखल झाले. आता या नाटकाचा 25 वा प्रयोग उद्या रवि. 19 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे सादर होणार आहे.