Entertainment News Live Updates 18 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 18 Apr 2023 05:25 PM
Nandini Gupta: वडील शेतकरी, वयाच्या 10 व्या वर्षी पाहिलं ब्युटी क्वीन होण्याचं स्वप्न; 'असा' आहे 'मिस इंडिया' नंदिनी गुप्ताचा प्रवास

Nandini Guptaनंदिनी गुप्ता (Nandini Gupta) ही मिस इंडिया 2023 या स्पर्धेची विजेती ठरली. या स्पर्धेत श्रेया पुंजा आणि  स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फर्स्ट आणि सेकंड रनर-अप ठरल्या.  फेमिना मिस इंडिया 2023 चा खिताब जिंकल्यानंतर, राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षाच्या नंदिनी  गुप्ताने एबीपी न्यूजसोबत संवाद साधला. यावेळी नंदिनीनं तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं.


नंदिनी ही मुंबईच्या लाला लजपत राय कॉलेजमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. नंदिनीने एबीपी न्यूजला सांगितले की, तिच्या आईने तिला ब्युटी क्वीन बनण्याचे स्वप्न दाखवले होते आणि तेव्हा नंदिनी फक्त 10 वर्षांची होती.  


  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hemangi Kavi : हेमांगी कवीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष; म्हणाली, 'आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली आहे.'

Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.  हेमांगीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. हेमांगी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं सोशल मीडियावर बिनधास्तपणे मांडत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हेमांगीनं तिचे बालपण आणि तिचे आई-बाबा या विषयांवर चर्चा केली. 





Sundara Manamadhe Bharli: 'अनेकवेळा सीरिअलमधील हिरोईनकडे...'; सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील भूमिकेबद्दल भरभरुन बोलली अक्षया

Sundara Manamadhe Bharliसुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)  या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षया नाईक  (Akshaya Naik) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात. अक्षया आणि समीर यांच्या मालिकेमधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. अक्षया नाईक ही या मालिकेमध्ये लतिका ही भूमिका साकारते. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यातील  'स्फूर्तीदायक व्यक्तीरेखा स्त्री' या कॅटेगिरीमधील  अक्षयाला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकल्यानंतर अक्षयानं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.



Ileana D’Cruz Pregnant: लग्नाआधीच इलियाना होणार आई, खास पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज; नेटकरी म्हणाले, 'बाळाचे वडील कोण?'

Ileana D’Cruz Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. इलियाना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इलियाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इलियानानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.



Kaun Banega Crorepati: 'केबीसी 15' मध्ये सहभागी व्हायचंय? 'या' दिवशी होणार रजिस्ट्रेशनला सुरुवात; मजेशीर प्रोमोमध्ये बिग बींनी दिली माहिती

Kaun Banega Crorepati: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती-14 (Kaun Banega Crorepati-14) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सिझनच्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धकांनी सहभाग घेतला. कौन बनेगा करोडपतीच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कौन बनेगा करोडपती-15 (Kaun Banega Crorepati-15) चा मजेशीर प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनबाबत माहिती देताना दिसत आहेत. 


पाहा प्रोमो





Ranbir Kapoor Expensive Gift: लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला रणबीरनं आलियाला दिलं खास गिफ्ट? किंमत ऐकून व्हाल अवाक्!

Ranbir Kapoor Expensive Gift: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक आहेत. हे दोघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही  दिवसांपूर्वी रणबीर आणि आलिया यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. यानिमित्तानं रणबीरने आलियाला खास गिफ्ट दिलं. अॅनिमलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या रणबीरने त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलियासाठी लंडनहून खास गिफ्ट आणले.  रणबीर कपूर नुकताच लंडनहून परतताना विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याच्या हातात एक हँडबॅग  दिसली. ही हँडबॅग रणबीरनं आलियासाठी घेतली होती, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Aai Kuthe Kay Karte: आशुतोष घेतोय अरुंधतीची काळजी; 'आई कुठे काय करते !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष



Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकताच या मालिकेच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


Pooja Hegde Troll: इफ्तार पार्टीसाठी पूजा हेगडेनं केलेल्या लूकवर भडकले नेटकरी; म्हणाले, 'ही डान्स पार्टी नाही...'



Baba Siddique:  काल (16 एप्रिल) मुंबईतील (Mumbai) ताज लँड्स हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी (Baba Siddique)  आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती.या पार्टीला मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेनं (Pooja Hegde) खास लूकमध्ये हजेरी लावली.  इफ्तार पार्टीतील पूजाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इफ्तार पार्टीसाठी पूजानं केलेल्या लूकला अनेकांनी ट्रोल केलं आहे. 


डोंगर; आईचे झाले निधन



Mahima Chaudhry Mother Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या (Mahima Chaudhry) आईचे निधन झाले आहे. महिमा चौधरीच्या आईचे तीन ते चार दिवसांपूर्वी निधन झाल्याची, माहिती समोर आली आहे. महिमा आणि माहिमाची मुलगी आरियाना यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमा आणि तिच्या मुलीसाठी हा खूप कठीण काळ आहे.


800 Poster: '800' चा फर्स्ट लूक रिलीज; 'हा' अभिनेता मुथय्या मुरलीधरनच्या भूमिकेत



800 Poster:  श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) हा एक स्पिन‌र म्हणून जगभरात ओळखला जातो.  मुथय्याने आपल्या करिअरमध्ये एकूण 16 विश्वविक्रम केले आहेत.   2002 मध्ये, मुरलीधरनला विस्डेनच्या क्रिकेटर्स अल्मानॅकने जगातील सर्वोत्तम कसोटी सामना गोलंदाज म्हणून घोषित केले. 2017 मध्ये, मुरलीधरन हा ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारा पहिला श्रीलंकेचा गोलंदाज ठरला. मुरलीधरनचा आज (17 एप्रिल) वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त 800 या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.