शिर्डी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवाराच्या (NCP Ajit Pawar) पक्षांच्या शिबीर शिर्डी येथे पार पडत आहे. आज या शिबीरासाठी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित आहेत. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवरती होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप याच्यावरती आज त्यांनी भाष्य केलं.  बीडचा बिहार झाला, कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे, असे करु नका. मला टार्गेट करण्यासाठी काही लोक करत हे आहेत, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मुंडेंच्या (Dhananjay Munde) या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यावर सडेतोड उत्तर देत बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय, असं म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती पोस्ट लिहून धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.


नेमकं काय म्हटलंय दमानियांनी आपल्या पोस्टमध्ये?


अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मिडियावर पोस्ट लिहून धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. "धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडनी केली, सुदर्शन घुलेनी केली, विष्णू चाटेनी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने….. जाऊ द्या बोलवत नाही. बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीड बद्दल काय म्हणाली वाचा. “राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतं आहे’. ‘याप्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा', आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्ष हिताचं नाही”, आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा," अशा शब्दात त्यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. 




काय म्हणाले होते धनंजय मुंडे?


मला टार्गेट करण्यासाठी काही लोक करत हे आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी अजित दादांवर आली आहे. फक्त बीड नाही तर अख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. बीड जिल्ह्यात आमचे सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्याच समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी हे केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. त्या गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला, कोणी केला. 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळीत एक आहे. याला बदनाम करू नका, असं आवाहन त्यांनी केलं होतं. 


देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवा: धनंजय मुंडे


बीड जिल्ह्यात आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्याचे समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. पाच ते आठ गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला, कोणी केला? 12 ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे. असे करु नका, ही माझी हात जोडून विनंती असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.