Entertainment News Live Updates 17 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2022 05:36 PM
कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2'ने पार केला 175 कोटींचा टप्पा; 19 जूनला नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

Bhool Bhulaiyaa 2 OTT Release Date : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 175 कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होणार आहे. 'भूल भुलैया 2' हा सिनेमा आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 19 जूनपासून हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 

Lagaan : 'लगान'ची 21 वर्षे; आमिर खानच्या घरी कलाकारांची पार्टी

Lagaan : अलीकडेच सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) 'लगान: वन्स अपॉन अ टाइम'ची 21 वर्षे त्याच्या घरी साजरी केली. या सोहळ्यासाठी चित्रपटातील नामवंत कलाकारही त्यांच्या घरी उपस्थित होते. 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झालेला लगान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. ऑस्कर आणि अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या तीन भारतीय चित्रपटांपैकी हा एक होता. आमिर खानच्या प्रॉडक्शनने 'लगान' टीमच्या इंटिमेट सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील 'चले चलो' हे गाणे वाजत असून संपूर्ण टीम एकत्र मस्ती करताना दिसत आहे.

थलैवा 'रजनीकांत'च्या 'जेलर' सिनेमाचे पोस्टर आऊट

Jailer : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने (Rajinikanth) त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'जेलर' (Jailer) असे या सिनेमाचे नाव आहे. हा तामिळ भाषेतील सिनेमा असून नेलसन दिलीप कुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. शुक्रवारी निर्मात्यांनी या सिनेमाचे पोस्टर रिलीज केलं आहे. त्यामुळे रजनीकांतचे चाहते आनंदी झाले आहेत. 

पद्मा रानी ओमप्रकाश यांचे निधन

Padma Rani Omprakash passes away : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशनच्या (Hrithik Roshan) आजीचे म्हणजेच पद्मा रानीओमप्रकाश (Padma Rani) यांचे निधन झाले आहे.  वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्या ती बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. गुरुवारी (16) त्यांचे मुंबई येथे निधन झालं आहे. रिपोर्टनुसार, रात्री तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (शुक्रावार) पद्मा रानी यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


वाचा सविस्तर बातमी 

कुणी म्हणतंय तिचं वक्तव्य चूक, तर कुणी देतंय पाठिंबा! साई पल्लवीच्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर गदारोळ!

Sai Pallavi : दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या तिच्या आगामी चित्रपट 'विराट पर्वम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे काही वक्तव्य केले की, त्यावरून वाद सुरू झाला आहे. साई पल्लवीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे. यानंतर आता तिच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर देखील वादविवाद सुरु झाला आहे. अनेक लोक तिच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहेत. तर, काही तिच्यावर टीका करत आहेत.


अभिनेत्री साई पल्लवी तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘या चित्रपटात काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण, त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?’ यावर आता नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

'सिनेमा हा माझा पॅशन नाही, फक्त पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे'; पीयूष मिश्रांचा गौप्यस्फोट

Piyush Mishra : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार पीयूष मिश्रा (Piyush mishra) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. अभिनयासोबतच पीयूष हे गीतकार देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून पीयूष हे बॉलिवूडमधून गायब झाले आहेत. 2017 मध्ये दिग्दर्शक दक्षिण बजरंगे यांच्या ‘समीर (Sameer)’ चित्रपटामधील गाणं त्यांनी लिहिलं. त्यानंतर ते बॉलिवूडपासून दूर गेले. एका मुलाखतीमध्ये पीयूष यांनी बॉलिवूडपासून दूर राहण्याचे कारण सांगितले. 


वाचा सविस्तर बातमी 

‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’मध्ये सागर कारंडे-भारत गणेशपुरेची एन्ट्री, धमाल विनोदांनी परीक्षकही प्रभावित!

India’s Laughter Champion : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ म्हणजे भारतीय प्रेक्षकांसाठी वीकएंडची पर्वणीच आहे! 11 जून पासून सुरू झालेला हा शो, त्यातील मजेदार कंटेन्टमुळे प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत चालला आहे. अर्चना पूरण सिंह आणि शेखर सुमन या शोमध्ये परीक्षणाचे काम करत असून, या शोमध्ये दर आठवड्याला नवे नवे स्पर्धक येतात आणि उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या उमेदीने आपले धमाल अॅक्ट सादर करतात.


या व्यतिरिक्त, प्रत्येक भागात या धमाल-आनंदात भर घालायला एका प्रसिद्ध विनोदवीराला सरपंच म्हणून आमंत्रित करण्यात येते. या रविवारी सरपंच म्हणून सुरेश अलबेला हा विनोदवीर येणार आहे. या भागात इतर स्पर्धकांसोबत मुंबईच्या विनोदवीरांची प्रसिद्ध जोडी अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेता सागर कारंडे या शोमध्ये स्पर्धक म्हणून येणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पाहा IMDBच्या पाच बेस्ट वेब सीरीज

IMDB Top 5 Web Series : लोकांना मनोरंजनासाठी चित्रपट किंवा वेब सिरीज बघायला आवडतात. ओटीटी प्लॅटफोर्मवरील (OTT PLatforms) वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. काही क्राईम, थ्रिलर आणि अॅक्शन असणाऱ्या सीरिज प्रेक्षक आवडीनं पाहतात. आयएमडीबीकडून चांगले रेटिंग्स देण्यात आलेल्या वेब सीरिज तुम्ही या विकेंडला पाहू शकता. या वीकेंडला तुम्हा आयएमडीबीच्या टॉप-5 (IMDB Top 5 Web Series)  वेब सीरीज पाहू शकता. 


वाचा सविस्तर बातमी 

झगमगाटी आयुष्यामागची दुःखद कहाणी, मर्लिन मुन्रोंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज!

Blonde Teaser Out : अभिनेत्री मर्लिन मुन्रो (Marilyn Monroe) यांचे आयुष्य प्रत्येकासाठीच एक कुतूहल होते. त्याच्या मृत्युला इतकी वर्ष लोटली असतानाही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यांचं आयुष्य नेहमी झगमगाटी दिसत असलं, तरी या मागे प्रचंड वेदना आणि दुःख लपलं होतं. मर्लिन मुन्रो यांच्या याच आयुष्याची कथा सांगणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सच्या या चित्रपटाचे नाव ‘ब्लाँड’ (Blonde) असे आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.


अभिनेत्री अॅना डी अरमास या चित्रपटात मर्लिन मुन्रो यांची भूमिका साकारताना दिसतायत. मर्लिन यांचे व्यक्तिमत्व असे होते, की जो कोणी त्यांना भेटला, तो प्रभावित झाल्याशिवाय राहिला नाही. या टीझरमध्ये चाहत्यांना आणि प्रेक्षकांना त्याच मर्लिन मुन्रोंची एक झलक पाहायला मिळते.


 


झगमगाटी आयुष्यामागची दुःखद कहाणी, मर्लिन मुन्रोंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज!

Blonde Teaser Out : अभिनेत्री मर्लिन मुन्रो (Marilyn Monroe) यांचे आयुष्य प्रत्येकासाठीच एक कुतूहल होते. त्याच्या मृत्युला इतकी वर्ष लोटली असतानाही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यांचं आयुष्य नेहमी झगमगाटी दिसत असलं, तरी या मागे प्रचंड वेदना आणि दुःख लपलं होतं. मर्लिन मुन्रो यांच्या याच आयुष्याची कथा सांगणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सच्या या चित्रपटाचे नाव ‘ब्लाँड’ (Blonde) असे आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.


अभिनेत्री अॅना डी अरमास या चित्रपटात मर्लिन मुन्रो यांची भूमिका साकारताना दिसतायत. मर्लिन यांचे व्यक्तिमत्व असे होते, की जो कोणी त्यांना भेटला, तो प्रभावित झाल्याशिवाय राहिला नाही. या टीझरमध्ये चाहत्यांना आणि प्रेक्षकांना त्याच मर्लिन मुन्रोंची एक झलक पाहायला मिळते.


 


'योग योगेश्वर जय शंकर'च्या टायटल ट्रॅकला प्रेक्षकांची पसंती!

Yog Yogeshwar Jay Shankar : अनेक लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे कुणाल भगत आणि करण सावंत. त्याच बरोबर संगीत विश्वात आपल्या सुमधूर आवाजाचा ठसा उमटवणारी ट्रेंडींग गायिका म्हणून सोनाली सोनावणे प्रसिद्ध आहे. या तिघांनी मिळून नुकतंच 'योग योगेश्वर जय शंकर' (Yog Yogeshwar Jay Shankar) या मालिकेचं टायटल ट्रॅक तयार केलं आहे. या मालिकेचं टायटल ट्रॅक गायिका सोनाली सोनावणे व गायक रविंद्र खोमणे यांनी गायले आहे. तर, कुणाल करण यांनी हे गाणं लिहीले असून, संगितबद्ध ही त्यांनीच केले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे.


या टायटल ट्रॅकचं रेकॉर्डींग कुणाल-करणच्या नवी मुंबई येथील एलीक्झर स्टुडीओमध्ये करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या टायटल ट्रॅकची तुफान चर्चा आहे.


वाचा संपूर्ण बातमी

योगा शिक्षिका बनण्याचं स्वप्न सोडून मॉडेलिंगकडे वळली अन् नशीबच पालटलं!

Lisa Haydon Birthday : मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. लिसाचा जन्म 17 जून 1986 रोजी चेन्नईमध्ये झाला. तिचे वडील वडील भारतीय, तर आई अॅना हेडन मूळची ऑस्ट्रेलियन आहे. लिसाचे खरे नाव एलिझाबेथ मेरी हेडन आहे. बालपणापासून लिसाला योगा टीचर व्हायचे होते. पण, मित्र परिवाराच्या सांगण्यावरून तिने मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.


आई ऑस्ट्रेलियन असल्याने लिसाने आयुष्याची पहिली वर्षे त्यांनी परदेशात घालवली. लिसाला लहानपणापासून योगाची आवड आहे. तिने मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर पॉकेटमनीसाठी ऑस्ट्रेलियात मॉडेलिंग सुरू केले. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती 2007मध्ये भारतात आली होती. भारतात आल्यानंतर ती अनेक नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसली. अभिनयापूर्वी लिसा जाहिरात विश्वात खूप प्रसिद्ध होती. भारतात तिची पहिली जाहिरात Hyundai i20 कारची होती, तर ऑस्ट्रेलियात तिने एका स्ट्रेच मार्क क्रीमची पहिली जाहिरात केली होती.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


केतकीला जामीन मिळूनही तुरुंगवास कायम!


Ketaki Chitale Case : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दलच्या वादग्रस्त पोस्टनंतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) अडचणीत सापडली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावरील इतर गुन्ह्यांचा तपासही सुरु आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार केतकीला अॅट्रोसिटी काद्यान्वे जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांच्या दंडानंतर तिला जामीन मंजूर ढाला असला तरी तुरुंगातून मात्र तिची सुटका अद्याप झालेली नाही. कारण एका दुसऱ्या केसची सुनावणी केतकीविरुद्ध सुरु असून ही सुनावणी 21 जून रोजी होणार असल्याने ती अद्यापही जेलमध्येच राहणार आहे. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात उडी घेत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.


अभिनेत्री केतकीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला तुरुंगात देखील टाकण्यात आलं आहे. या प्रकरणात सतत नवनवीन अपडेट समोर येत असून नुकतच केतकीने मुंबई उच्च न्यायालयात तिला झालेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल केली. ज्यानंतर आता केंद्रीय महिला आयोगाने देखील तिच्या बाजूने येत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.


अभिनेत्री केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली आहे, असे म्हणत कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल केला गेला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, ती सध्या कारागृहात आहे. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीनं आता उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीनं आपल्या याचिकेतून केला असून याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.