एक्स्प्लोर

Sai Pallavi Controversial Statement : कुणी म्हणतंय तिचं वक्तव्य चूक, तर कुणी देतंय पाठिंबा! साई पल्लवीच्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर गदारोळ!

Sai Pallavi : साई पल्लवीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे.

Sai Pallavi : दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) सध्या तिच्या आगामी चित्रपट 'विराट पर्वम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे काही वक्तव्य केले की, त्यावरून वाद सुरू झाला आहे. साई पल्लवीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे. यानंतर आता तिच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर देखील वादविवाद सुरु झाला आहे. अनेक लोक तिच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहेत. तर, काही तिच्यावर टीका करत आहेत.

अभिनेत्री साई पल्लवी तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘या चित्रपटात काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण, त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?’ यावर आता नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा काय म्हणतायत नेटकरी..

सई पल्लवीच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान काही ट्विटर युजर्सनी ट्विट करून लिहिले की, 'तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचे आहे'.  तर, काही युजर्स म्हणत आहेत की, 'आम्हाला साई पल्लवीची बेधडक स्टाईल आवडली. दाक्षिणात्य कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत'. अर्थात साई पल्लवीच्या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

साई पल्लवीच्या ‘विराट पर्वम’ची चर्चा

'विराट पर्वम' या चित्रपटात साई पल्लवीने एका नक्षलवाद्याच्या प्रेमात पडलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिचा हा चित्रपट 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच्या प्रमोशनदरम्यान मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना साईने हे वादग्रस्त विधान केले आहे. ‘विराट पर्वम’मध्ये सईसोबत राणा दग्गुबती, प्रियामणी आणि नंदिता दास देखील दिसणार आहेत. ही प्रेम आणि राजकारणाची संमिश्र कथा आहे. राणा दग्गुबती या चित्रपटाचा निर्माताही आहे.

हेही वाचा :

In Pics: मेकअप न करताही साई पल्लवीचं सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

PHOTO: बनवा साउथ क्वीन साई पल्लवीला तुमची इन्स्पीरेशन; घ्या टिप्स!

'या' कारणाने साईनं आत्मविश्वास गमावला होता

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir Kapoor Ganpati Bappa Prasad: 'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
Mandakini On Ram Teri Ganga Maili: धबधबा अन् ब्रेस्टफीडिंग सीन; 16व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली'मध्ये काम करताना मंदाकिनींचा अनुभव, सांगितला शूटिंगमागचा किस्सा
धबधबा अन् ब्रेस्टफीडिंग सीन; 16व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली'मध्ये काम करताना मंदाकिनींचा अनुभव, सांगितला शूटिंगमागचा किस्सा
Hanuman Ansh Box Office Collection Day 40: 'हनुमान अंश' 300 कोटींच्या उंबरठ्यावर, 40व्या दिवशीही धुवांधार कमाई; 'छावा', 'धुरंधर', 'पठान' सर्वांना लोळवलं
'हनुमान अंश' 300 कोटींच्या उंबरठ्यावर, 40व्या दिवशीही धुवांधार कमाई; 'छावा', 'धुरंधर', 'पठान' सर्वांना लोळवलं
PM Modi 76th Birthday Celebrity Wishes: 'मी पंतप्रधानांची मोठी चाहती'; सिनेविश्वातील कलाकारांकडून पीएम नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुणी काय म्हटलं?
'मी पंतप्रधानांची मोठी चाहती'; सिनेविश्वातील कलाकारांकडून पीएम नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुणी काय म्हटलं?

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
वाचाल तर वाचाल! स्मार्टफोन आणि रिलचा नाद सोडा अन् दररोज फक्त 15 मिनिटे वाचा; सरकार थेट खात्यात पैसे जमा करणार, कोणत्या देशाने आणला मास्टर प्लॅन?
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचं काय होणार?; राज्य सरकारकडून हालचाली, सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचं काय होणार?; राज्य सरकारकडून हालचाली, सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
ट्रम्पचा भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा मार्ग मोकळा, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याचा अधिकार मिळाला, अमेरिकी संसदेत विधेयक मंजूर
Pune Tukaram Mundhe FDA Actions: सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
सणासुदीच्या काळात पुण्यात ‘एफडीए’ची मोठी कारवाई, 12 आस्थापनांवर छापे, 56 लाखांचा अन्नसाठा जप्त
Ind vs WI Team India Squad Against West Indies ODI: रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad
रवींद्र जडेजा, नमन धीर, आकिब नबी IN...; वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा चक्रावणारा संघ, पाहा संपूर्ण Squad
Mumbai Crime News: कौटुंबिक कलहाचा भयंकर अंत; दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच भावाचा काढला काटा, मुंबई हादरली!
कौटुंबिक कलहाचा भयंकर अंत; दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच भावाचा काढला काटा, मुंबई हादरली!
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis And Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
PM Modi 76th Birthday Celebrity Wishes: 'मी पंतप्रधानांची मोठी चाहती'; सिनेविश्वातील कलाकारांकडून पीएम नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुणी काय म्हटलं?
'मी पंतप्रधानांची मोठी चाहती'; सिनेविश्वातील कलाकारांकडून पीएम नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कुणी काय म्हटलं?
Embed widget